नगर (दि.7 प्रतिनिधी):- शहरातील तारकपूर येथील राधाबाई काळे महाविद्यालयात सात दिवसांचे धम्मलिपी प्रशिक्षण घेण्यात आले,सदर प्रशिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व रयत शिक्षण संस्थेचे राधाबाई काळे महिला महाविद्यालय अहिल्यानगर विद्यार्थी विकास मंडळ इतिहास विभाग व पेमराज सारडा कॉलेज,दान पारमिता फाऊंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ७ दिवसीय धम्मलिपि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे उद्घाटन धम्मलिपि तज्ञ सुनील खरे यांनी केले,प्रतिमा पूजन प्राचार्य डॉ.एस आर थोपटे,प्रा.गणेश विधाटे,डॉ.सुरेखा गांगुर्डे इत्यादीने केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक गणेश विधाटे यांनी केले सात दिवसाच्या या कार्यशाळेत धम्मलिपिची संपूर्ण बाराखडी,स्वर व्यंजने व जोडाक्षरे शिकवण्यात आले व भरहुत ह्या बौद्ध स्थळा वरील असलेले शिलालेख लिप्यांतर करून घेण्यात आले, या कार्यशाळेत धम्मलिपि शिकलेल्या विद्यार्थ्यांना धम्मलिपी प्रशिक्षण घेतल्याचे सर्टिफिकेट देण्यात आले.
सर्व प्रशिक्षणार्थीनी पाली भाषेतील संविधान उद्देशिका धम्मलिपि मध्ये तयार केली,उत्कृष्ट असाईंनमेंट करणाऱ्या पहिल्या सहा विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले,प्रथम क्रमांकाचे पारितोषिक अलफिया पठाण,द्वितीय प्रणाली गवारी,तृतीय पायल बढे,चौथे वैष्णवी गायकवाड,पाचवे साक्षी राजापूरकर,सृष्टी झिने असे पारितोषिके ह्यावेळी प्रा.लहू गायकवाड व सुनील खरे ह्यांच्या हस्ते देण्यात आली.दि.६ फेब्रुवारी गुरुवारी रोजी कार्यशाळेचा समारोप करण्यात आला,समारोपाच्या दिवशी इतिहास अभ्यासक प्राध्यापक लहू गायकवाड यांचे “इतिहासातील व्यवसायाच्या संधी ” या विषयावर व्याख्यान झाले,सूत्रसंचालन भाग्यश्री कांबळे ह्या विद्यार्थीनीने केले.आभार प्रदर्शन प्रा.अमोल बुचुडे यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण उपप्राचार्य डॉ.भुपेंद्र निकाळजे ह्यांनी केले,ह्या प्रसंगी प्राचार्य एस आर धोपटे,प्रा.डॉ.सुरेखा गांगुर्डे,प्रा. राणी पवार तसेच इतर शिक्षक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.