अकलुज प्रतिनिधी:- पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे सर व राष्ट्रीय कार्याध्यक्ष महाराष्ट्र लघुउद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष जयदीपभाई कवाडे व महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पीपल्स रिपब्लिकन पार्टी माळशिरस तालुक्याच्या वतीने माता रमाई जयंती निमित्त एक हजार लोकांना दालचा भात व शिरा अन्नदान कार्यक्रम घेण्यात आला.गणेशनगर अकलूज येथील संपर्क कार्यालयासमोर अकलूजचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.अनिकेत इनामदार यांच्या हस्ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्रिसरण पंचशील ग्रहण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे नंदकुमार केंगार,बौद्धाचार्य भीमराव गायकवाड गुरुजी, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले,कॉन्ट्रॅक्टर राजेंद्र काटे,सुनंदाताई लोंढे,सेंट्रल ह्युमन राईट संघटनेचे अध्यक्ष डॉ.कुमार लोंढे,पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन जाधव, तालुका संपर्कप्रमुख सावता नवगिरे,चौंडेश्वरवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच सतीश शिंदे,विठ्ठल खंदारे,अकलूज परिसर धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत वाघे,उपाध्यक्ष निलेश ठोंबरे,वंदे मातरम गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी संग्राम भिलारे,गणेश अनपट,महेश वाघ,अमोल प्रक्षाळे आधी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी डॉ.अनिकेत इनामदार म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची माता रमाई प्रेरणा होत्या माता रमाई यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना संकटामध्ये साथ दिल्यामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढू शकले त्यामुळे माता रमाई यांचे योगदानही खूप मोलाचे आहे या मातेच्या जयंती निमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पीपल्स रिपब्लिकन पार्टी माळशिरस तालुक्याच्या वतीने 1000 लोकांना अन्नदान करण्याचा कार्यक्रम कौतुकास्पद असून सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
दुपारी बारा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत अन्नदानाचा कार्यक्रम सुरू होता सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माळशिरस तालुका अध्यक्ष विश्वास उगाडे, तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे, तालुका संपर्कप्रमुख रोहिदास तोरणे,तालुका सहसरचिटणीस अनिल तोरणे,तालुका प्रसिद्धी प्रमुख योगेश डावरे,तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब ननवरे, तालुका युवक अध्यक्ष कबीर मुलानी,युवक तालुका संघटक विकी लोंढे,महिला आघाडी तालुकाध्यक्ष स्वातीताई धाईंजे, अकलूज शहराध्यक्ष पुष्पा भडंगे, अकलूज शहर अध्यक्ष शिवाजी खडतरे,उपाध्यक्ष साजिद बागवान,कार्याध्यक्ष शहाजी खडतरे,सरचिटणीस मन्सूर काझी,ऋषिकेश गायकवाड, रवी माने,राया साळवे,दत्ता थोरात, सोनू जगताप,शिव लोंढे,यश लोंढे,ओम कारंडे आदींनी परिश्रम घेतले त्यानंतर अकलूज मधील उबंटू मैत्रालय येथील गरीब मुलांना आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते पी एस गायकवाड यांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले यावेळी मैत्रालयातील मुलांसोबत मिळून पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी जेवण केले.यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तालुका युवक अध्यक्ष कबीर मुलानी तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे तालुका युवक संघटक विकी लोंढे अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे, शिव लोंढे यांचेसह उबंटू मैत्रालयातील अक्षय जाधव यांचेसह विद्यार्थी उपस्थित होते.