प्रतिनिधी:-पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने श्री.संत रोहिदास महाराज यांच्या जयंती निमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक गुडे यांच्या हस्ते फळे बिस्किट यांचे किट व पाणी बाटली वाटप करण्यात आले.

यावेळी प्रथम श्री संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे यांनी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना केळी,बिस्किट व पाण्याची बॉटल वाटप कार्यक्रम घेऊन एक चांगला उपक्रम घेतला असून त्यांचे अभिनंदन केले तसेच अकलूज उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक गुडे यांनीही सदर कार्यक्रमाचे कौतुक करून उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांचा सत्कार केला.

रुग्णालयातील रुग्णांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे आभार मानले व आपल्या हातून अशाच गोरगरिबांची सेवा घडावी शुभेच्छा दिल्या यावेळी रुग्णालयामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे,युवक तालुकाध्यक्ष कबीर मुलानी, तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे,तालुका संपर्कप्रमुख राजू बागवान,तालुका युवक संघटक विकी लोंढे,तालुका युवक संपर्कप्रमुख योगेश डावरे, माळशिरस तालुका महिला आघाडी अध्यक्ष स्वातीताई धाईंजे,अकलूज शहराध्यक्षा पुष्पाताई भडंगे,अकलूज शहर उपाध्यक्ष साजिद बागवान, तालुका कार्यकारणी सदस्य सागर झेंडे,आकाश गायकवाड,अजय साळुंखे,चरण साळुंखे, वैभव अंबुरे,दत्ता थोरात,राज लोंढे,अविनाश धाईंजे,ऋषिकेश खडतरे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.