अहिल्यानगर (दि.15 प्रतिनिधी):-शिर्डी येथे गावठी कट्ट्यासह सराईत आरोपीस जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांची माहिती काढुन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या पथकाला दिलेले होते.
त्यानुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील अंमलदार शिर्डी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अग्निशस्त्र, हत्यारे बाळगणारे इसमांची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे अमोल सिध्दार्थ दिवे,रा.शिर्डी हा गावठी कट्टा बाळगुन विक्री करण्याचे उद्देशाने हॉटेल राजेजवळ, कनकुरी रोड,नांदुर्खी रोड येथे थांबलेला असल्याची माहिती मिळाली.पथकाने पंचासमक्ष बातमीतील ठिकाणी सापळा रचुन संशयीत इसमास ताब्यात घेऊन नाव विचारले असता त्याने अमोल सिध्दार्थ दिवे,वय24,रा.गोवर्धननगर,शिर्डी,ता.राहाता,जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडून 50,000/- रू किंमतीचे एक गावठी पिस्टल, 1,500/- रू किं. एक जिवंत काडतुस व 20,000/-रू किं. एक मोबाईल असा एकुण 70,000/- रू.किं.मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ताब्यातील आरोपीकडे मिळालेल्या अगिशस्त्रांबाबत विचारपूस केली असता त्याने नमूद अग्नीशस्त्र हे मुजम्मिल हारुन बागवान रा.श्रीरामपुर (फरार) याचेकडुन खरेदी करुन विक्रीकरीता आणल्याचे सांगितले.वर नमूद आरोपीविरूध्द शिर्डी पोलीस स्टेशन गुरनं 158/2025 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन हे करीत आहे.सदरची कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर,श्री.वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधिक्षक,श्री. शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी उपविभाग,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पथकातील पोसई/तुषार धाकराव,पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, फुरकान शेख,बाळासाहेब नागरगोजे,बाळासाहेब गुंजाळ, प्रमोद जाधव,अमृत आढाव, प्रशांत राठोड,रमीजराजा आत्तार व महादेव भांड यांनी केलेली आहे.