अहिल्यानगर (प्रतिनिधी):-प.पू.आदिशक्ती श्री माताजी श्री निर्मला देवी यांच्या परम कृपेने सहजयोग ध्यान साधनेचा आत्मसाक्षात्काराचा कार्यक्रम रविवारी दि.18 मे 2025 रोजी सायंकाळी 06:30 वा.भव्य दिव्य असा चैतन्यमयी सोहळा अहिल्यानगर उपनगर सावेडी भागात होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्रचार प्रसार समितीने दिली आहे.
परमपूज्य श्री माताजी यांचे आजोळ हे अहिल्यानगर जिल्हा पूर्वी या जिल्ह्याचे नाव अहमदनगर होते याच ठिकाणी बऱ्याच वेळा श्री माताजी यांनी नवीन साधकांसाठी कार्यक्रम घेतले. अहिल्यानगर शहरातील सावेडी उपनगर हा भाग याच ठिकाणी 1987 मध्ये आदिशक्ती श्री माताजी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी याच भूमीमध्ये स्वतः श्री माताजी साकार रुपात असताना याच मैदानावरती नवीन साधकांसाठी पब्लिक प्रोग्राम घेतला पुन्हा आता हा योग बऱ्याच वर्षांनी आलेला आहे. या कार्यक्रमाचा प्रचार प्रसाराची सुरुवात दिनांक 15/05/2025 ते दिनांक 18/05/2025 पर्यंत या सावेडी उपनगरात सहजयोगी बंधू भगिनी प्रचार प्रसार करून 18 तारखेच्या कार्यक्रमाची पत्रिका वाटणार आहेत. या साठी अहिल्या नगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून सहजयोगी येणार आहेत.
शनिवार संध्याकाळी 7.00 वा. सहज भुवन आश्रम, गोविंदपुरा, अहिल्या नगर येथे अमरावती येथील सहजयोगी दलाल बंधू श्री संदीप दलाल व श्री मिलिंद दलाल यांचा भजन संध्याचा कार्यक्रम होणार असून 18 मे रोजी सकाळी 11 वा. सहजयोग्यांसाठी सेमिनार होईल व दुपारी 04=00 वा. प. पु. माताजी श्री निर्मला देवी यांची भव्य मेगा रॅली खंडेलवाल भुवन, जॉगिंग ट्रॅक जवळ येथून निघून सपकाळ चौक, यशोदा नगर मार्गे पाईप लाईन रोड, भिस्तबाग चौक कुष्टधाम रोड, प्रोफेसर चौक मार्गे जॉगिंग ट्रॅक मैदान येथे येईल व सायंकाळी 6.30 वा अहिल्या नगर मधील साधकांसाठी भव्य पब्लिक प्रोग्राम कुंडलिनी शक्ती जागृती चा कार्यक्रम होणार आहे. या साठी सावेडी उपनगर सह अहिल्या नगर मधील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्रचार प्रसार समिती चे वतीने प्रा. नितीन पवार, अमोल यावलकर, श्रीनिवास बोज्जा, मेजर कुंडलिक ढाकणे व अमित बुरा यांनी केले आहे.