अहिल्यानगर (प्रतिनिधी):- नगर शहरातील माळीवाडा ब्राह्मण गल्ली येथील शंकर सावली मठातील सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्याला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे.त्याच्या ताब्यातून सोन्या चांदीचा ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.रुपेश दादासाहेब खोजे (रा. कासार पिंपळगाव ता.पाथर्डी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

तो बसस्थानक परिसरात येणार असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार कोतवाली पोलिसांचे पथक बस स्थानक परिसरात सापळा रचून थांबले असताना त्याला ताब्यात घेतले व त्याने गुन्ह्याची कबुली दिऊन मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात दिला.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती,कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे,रोहिणी दरंदले,राजेंद्र औटी,संदीप पितळे,विशाल दळवी,दीपक रोहकले,तानाजी पवार,सुरज कदम,शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर,सोमनाथ केकान,राम हंडाळ,सचिन लोळगे,महेश पवार,सोमनाथ राऊत,प्रतिभा नागरे यांनी केली आहे.
