जुन्या कोर्टाशेजारी कोतवाली पोलिसांचा सापळा..अवैध दारूची वाहतूक करणारी रिक्षा पकडली..आरोपी ताब्यात तर मुद्देमाल जप्त
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-कोतवाली पोलीसांनी देशी/विदेशी दारु विक्री करण्याच्या उद्देशाने कॉम्पॅक्ट रियर रिक्षाने वाहतुक करणाऱ्या इसमावर कारवाई करत देशी/विदेशी दारुसह एकुण-1 लाख 94.488/- रुपये किंमतीचा त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे.
हि कारवाई दि.24 जुलै 2025 रोजी शहरातील जुन्या कोर्टाशेजारी पोलिसांनी सापळा रचून केली आहे.चंद्रकांत मोहनलाल परदेशी (वय 38 वर्ष, रा.मंगलगेट हवेली,कोंड्यामामा चोक,अहिल्यानगर) असे पकडलेल्या संशयित आरोपीचे नाव असून त्याच्या विरुध्द पोकॉ.महेश सुभाष पवार यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 677/2025 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार सलीम शेख हे करीत आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री.सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधिक्षक श्री. वैभव कलूबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग श्री.अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.प्रताप दराडे, पोसई/गणेश देखमुख,गुन्हे शोध पथकाचे अंमलदार बाळकृष्ण दौंड,विशाल दळवी,सलीम शेख, विनोद बोरगे,सुर्यकांत डाके,अभय कदम,सत्यजीत शिंदे,अमोल गाडे,अतुल काजळे, सोमनाथ केकाण,महेश पवार, शिरीष तरटे,सचिन लोळगे, दत्तात्रय कोतकर,संभाजी कोतकर,मपोकॉ.प्रतिभा नागरे यांनी केली आहे.