मयत इसमाच्या नातेवाईकांचा शोध होण्याबाबत एमआयडीसी पोलिसांचे अवाहन..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- एमआयडीसी हद्दीतील निंबळक येथील रेल्वेलाईन पोल नंबर 362 ते 1210 मध्ये एक इसम दि.21 जुलै 2025 रोजी अवस्थेत मिळून आल्याने त्यास उपचाराकरिता सिव्हील हॉस्पिटल येथे आणले असता तो उपचारापूर्वीच मयत असल्याचे सिव्हील हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.
परंतु पोलिसांनी मयताचे नाव पत्ता तसेच त्याचे नातेवाईकांचा शोध घेतला परंतु काही एक माहिती मिळून आली नाही.त्यामुळे अकस्मात मृत्यूची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.तरी कोणाला काही याबाबत माहिती असल्यास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक जाधव मो.9850059119,0241-2416123 यांच्याशी संपर्क करावा असे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.