विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा भव्य अनावरण सोहळा..27 जुलै रोजी मार्केटयार्ड समोरील वाहतुकीत बदल पर्यायी व्यवस्था..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर शहरातील मार्केटयार्ड समोर असलेल्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकात डॉ.आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा अनावरण कार्यक्रम रविवारी (दि.२७) रोजी होणार आहे.या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहे. तसेच सदर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने जनसमुदाय येण्याची शक्यता आहे.त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक लगत असलेल्या अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील वाहतूक रविवारी सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत इतर रस्त्यांनी वळविण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग
चांदणी चौकातून पुण्याकडे जाणारी वाहतूक
कोठी चौक – महात्मा फुले चौक – चाणक्य चौक – सक्कर चौक मार्गे इच्छित स्थळी
पुण्याकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहतूक
सक्कर चौक – चाणक्य चौक – महात्मा फुले चौक – कोठी चौक मार्गे इच्छित स्थळी
सदरील आदेश हा शासकीय वाहने,ॲम्बुलन्स,फायर बिग्रेड व स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक कारणास्तव/कार्यक्रमाकरिता परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नाही.