शेतकरी,दिव्यांगांच्या विवीध मागण्यांसाठी संगमनेरमध्ये चक्काजाम…कृषिमंत्री यांनी शेतकऱ्यांची थट्टा करणे तात्काळ थांबवावे आणि मोबाईलवरील जुगारापेक्षा एक दिवस तरी सर्वसामान्य शेतकऱ्याचे जीवन जगावे
संगमनेर प्रतिनिधी (राजेंद्र मेढे):-महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू(रा.अध्यक्ष,प्रहार जनशक्ती) यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचा सातबारा कोरा,हमीभाव,विधवा तसेच दिव्यांग बांधवांना मासिक ६,०००/- अशा विवीध मागण्यांसाठी दि.२४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते, संगमनेर बस स्थानकासमोर पुणे-नाशिक हायवेवर चक्काजाम संपन्न झाला,उपस्थित शेतकऱ्यांनी अगदी हायवेच्या मध्यातच पत्त्याचा खेळ सुरु करत एक प्रकारे कृषिमंत्र्यांनाच लक्ष केले, तसेच उपस्थितांच्या भावना अतिशय तीव्र स्वरुपाच्या होत्या. यामध्ये शेतकरी तसेच दिव्यांग बांधवांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला.
आंदोलनकर्त्यांच्या वतीने प्रहारचे संगमनेर तालुकाध्यक्ष प्रदीप थोरात, शिप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे शिवश्री.राहुल ढेंबरे पाटील, विनायक दाभोळकर(दिव्यांग सारथी संघटना) यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या, प्रशासनाला निवेदन दिले.यावेळी मुख्यमंत्र्यानी “सातबारा कोरा”ची आश्वासनपुर्ती करावी शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष शिवश्री राहुल बाजीराव ढेंबरे पाटील यांनी बोलताना सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते, आश्वासनाची पुर्तता करण्यास सरकार पुर्णपणे टाळाटाळ करत असुन तमाम महाराष्ट्रातील शेतकरी आज रस्त्यावर उतरले असून तात्काळ सातबारा कोरा करावा अन्यथा शेतकऱ्यांनी याहीपेक्षा उग्र स्वरूपाचे आंदोलन केल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, शेतीमालाला हमीभाव,दिव्यांग बांधवांना मासिक ६०००/- रूपये पेंशन द्यावे तसेच राज्याचे कृषिमंत्री महोदयांनी शेतकऱ्यांची थट्टा करणे तात्काळ थांबवावे आणि मोबाईलवरील जुगारापेक्षा एक दिवस तरी सर्वसामान्य शेतकऱ्याचे जीवन जगावे म्हणजे शेतकऱ्यांच्या वेदना समजतील असा खोचक टोलाही लगावला.
यावेळी युवानेते अभिजीत दिघे, गणेश शेळके, निलेश थोरात चेअरमन, उपाध्यक्ष दिव्यांग संघटना संभाजी काळे, जालिंदर जाधव, शिवप्रतिष्ठाणचे राज्य संघटक हौशीराम मिंडे,अहिल्यानगर जिल्हा संघटक शिवनाथ नाईकवाडी, संगमनेर तालुकाध्यक्ष गणेश श्रीराम, तालुका उपाध्यक्ष जालिंदर गुळवे, तालुका संघटक तुषार ढेंबरे, सामाजिक कार्यकर्ते भिमाजी दिवटे, प्रसिद्ध शिवव्याख्याते ह.भ.प.शिवाजी महाराज दाते, प्रशांत थोरात, अरुण कुलधरण, अवधूत पोखरकर, बाळासाहेब गायकवाड, संदीप कुटे, अनिता फटांगरे, सुभाष साबळे, अशोक निळे, मीराबाई पिंगट, शिवनाथ घुले, अर्चना गवंडी, प्रमिला पडवळ, मंगल खतोडे, शिवनाथ घुले, वनिता उपाध्ये, अनिता फटांगरे, राणू फटांगरे, बाबुराव नागरे, संजय भालेराव, पांडुरंग कासार, विजू नवले, अन्सार सय्यद, सुरज येवले, अविनाश गायकवाड, गणेश कणसे, सागर एरंडे, ओम वाकचौरे, संजय बोंबले, सोमनाथ आव्हाड(संगमनेर तालुका मातंग समाज), संतोष रणशूर आदींसह तालुक्यातील शेतकरी/दिव्यांग बांधवांसह महाराष्ट्र पोलिसांचा फौजफाटाही मोठ्या प्रमाणावर तैनात होता.