स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकपदी किरणकुमार कबाडी यांची नियुक्ती..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- पोलीस अधिकारी यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या नेमणुकाबाबत दि.23 जुलै 2025 रोजी जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाची बैठक पार पडली या बैठकीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी नव्यानेच बदलून आलेले पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाड्डी यांची स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आली आहे.