‘सक्षम स्त्री-सक्षम समाज’चा संकल्प..अहिल्यानगरात प्रबोधन समितीचा भव्य रोजगार मेळावा आणि चर्चासत्र संपन्न
अहिल्यानगर दि.१४ फेब्रुवारी):-सेवाभावी संस्था प्रबोधन समितीच्या वतीने शैक्षणिक,आरोग्य,क्रीडा,सांस्कृतिक, सामाजिक तसेच रोजगार निर्मिती या विविध विषयांवर आधारित भव्य चर्चासत्र आणि रोजगार मेळाव्याचे आयोजन अहिल्यानगर येथे करण्यात आले. सकाळी ११ वाजता शासकीय योजनांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन सन्मा डॉ. सौ. सुनिताताई मोडक (राज्याध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. “सक्षम स्त्री – सक्षम कुटुंब – सक्षम समाज” या धर्तीवर विविध प्रकल्प राबवून महाराष्ट्रभर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.या चर्चासत्रात भारत सरकार प्रणित ‘गाव तिथे रोजगार’, लोक अदालत, शासकीय निधी योजना, लघुउद्योग, शैक्षणिक सहकार खात्याच्या योजना, उदरनिर्वाह व स्वयंरोजगार प्रकल्प आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. अहिल्यानगर जिल्ह्यातील २० तालुक्यांतील गावांपर्यंत या सर्व योजनांची माहिती पोहोचवण्यात आली असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
कार्यक्रमात राज्याची नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली –
सौ. प्रियंका बेरड – राज्य संपर्कप्रमुख
सौ. अश्विनी झरेकर – महिला रोजगार राज्य संपर्कप्रमुख
सौ. शुभांगी देशमुख – सांस्कृतिक राज्याध्यक्ष
तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील २० तालुक्यांवर प्रबोधन समिती उद्योजक मंच कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.या प्रसंगी डॉ. सौ. सुनिताताई मोडक – राज्याध्यक्ष,पंकज जैन – नासिक विभागीय अध्यक्ष,संतोष शिरसागर – उपाध्यक्ष,सौ. मनीषा आहीराव – उद्योजक मंच अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य व पत्रकार उमेश साठे यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची निवड
नवनियुक्त जिल्हा पदाधिकारी पुढीलप्रमाणे –
कल्याणी बेरड – जिल्हाध्यक्ष
आरती बेरड – जिल्हा उपाध्यक्ष
पूनम तांबे – जिल्हा कोषाध्यक्ष व जिल्हा संपर्कप्रमुख
ऐश्वर्या हजारे – जिल्हा उपसंपर्क प्रमुख
महिला सदस्यांची उत्स्फूर्त उपस्थिती
अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध शहर व तालुक्यांतील महिला सदस्यांच्या उपस्थितीत पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला.“आधी राष्ट्र, नंतर समिती, शेवटी स्वतः” या विचारधारेवर आधारित कार्यातून राज्यभर रोजगार निर्मितीचे व्यापक जाळे उभारले जाईल, अशी माहिती राज्य संपर्कप्रमुख सौ. प्रियंका बेरड यांनी दिली. त्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. महिला रोजगार राज्य संपर्कप्रमुख सौ. अश्विनी झरेकर यांनी कार्यक्रमाचे अनुमोदन केले, तर सांस्कृतिक राज्याध्यक्ष सौ. शुभांगी देशमुख यांनी उपस्थित महिला भगिनींचे आभार मानले.एकूणच, समाजातील विविध घटकांना शासकीय योजनांची माहिती देत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित हा मेळावा आणि चर्चासत्र उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाला.
