अवैध वाळु चोरी व वाहतुकी विरुध्द एलसीबीची धडक कारवाई
अहमदनगर प्रतिनिधी (दि.२ मार्च):-मिरजगांव,ता.कर्जत येथे अवैध वाळु चोरी व वाहतुकी विरुध्द कारवाई करुन 7,30,000/- रु. (सात लाख तीस हजार) रुपये किंमतीचा एक ढंपर व तीन ब्रास वाळु असा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.श्री.राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/बापुसाहेब फोलाणे,संदीप घोडके,पोना/शंकर चौधरी,लक्ष्मण खोकले व पोकॉ/कमलेश पाथरुट अशा पोलीस अंमलदार यांचे पथक नेमून अवैध वाळु चोरी व वाहतुकी विरुध्द कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.वरील पथकाने कर्जत तालुक्यात जावुन माहिती घेत असतांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाल्याने बेलगांव ते मिरजगांव रोडने जावुन मिरजगांव शिवारात कारवाई करुन अवैधरित्या वाळु चोरी व वाहतुक करणारे ठिकाणी छापे टाकुन एकुण 7,30,000/- रुपये किंमतीचा एक लाल रंगाचा ढंपर व त्यामध्ये एकुण 3 ब्रास वाळु असा मुद्देमाल जप्त करुन दोन आरोपीं विरुध्द मिरजगांव पोलीस स्टेशन येथे भादविक व पर्यावरण कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो खालील प्रमाणे
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम आरोपीचे नाव व पत्ता जप्त मुद्देमाल
1. मिरजगांव 59/23 भादविक 379 सह पकाक 3, 15 1. बापु सदाशिव खोटे वय 55, रा. वाकी, आष्टी, जिल्हा बीड 7,00,000/- दोन पांढरे रंगाचे ढंपर
30,000/- 3 ब्रास वाळु
एकुण 01 आरोपी ताब्यात घेतले व
1 आरोपी फरार 7,30,000/- एक लाल रंगाचा ढंपर व 3 ब्रास वाळु
सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर,श्री.अनिल कातकाडे साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी,नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.