साई एंजल इंटरनॅशनल स्कूलचे चौकशी करण्याचे शिक्षणाधिकारी यांचे आदेश;वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश-जिल्हा महासचिव योगेश साठे
अहमदनगर प्रतिनिधी (दि.२ मार्च):-दि.०७ जानेवारी २०२३ रोजी अहमदनगर जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव योगेश साठे यांनी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (मा) यांचेकडे निवेदनाद्वारे साई एंजल इंटरनॅशनल स्कूल प्रभाग क्र.२ तवलेनगर सावेडी येथील शाळेविरुद्ध अवाजवी फी तसेच शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन नावाखाली प्रत्येक विद्यार्थ्यांकडून जबरदस्तीने अवाजवी फी आकारली गेली आहे.याबाबत तक्रार केली होती त्या अनुषंगाने जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (मा) यांनी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नगर यांना योगेश साठे यांच्या निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या तक्रारीची तपासणी करून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.याबाबत साठे यांनी सांगितले की,शिक्षणाधिकारी (मा) यांचा उशिरा का होईना हा निर्णय स्वागतार्ह असून या निर्णयामुळे फायदा खासगी शाळे मार्फत सर्वसामान्य पालकांची होत असलेली लूट याला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली.त्याच अनुषंगाने योगेश साठे यांनी अवाजवी फी आकारली जाणाऱ्या प्रत्येक खासगी शाळा विरोधात जन आंदोलन करण्यात येणार आहे.तसेच खासगी शाळाच्या मनमानी कारभार थांबविण्यासाठी सर्वसामान्य पालकांनी समोर येऊन वंचित बहुजन आघाडी आणि शिक्षण अधिकारी यांचे कडे आपल्या तक्रारी नोंदवाव्यात असे आव्हान जिल्हा महासचिव योगेश साठे यांनी केले.