अकोले प्रतिनिधी(दि.१मार्च):-अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील मन्ह्याळे येथे एक धक्कादायक घटना समोर आली.आईसह दोन मुलींनी केलेल्या आत्महत्येमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून अकोले हादरलं आहे. तिघीच्या आत्महत्येमुळे मन्याळे गावावर शोककळा पसरली आहे.सुनिता जाधव (वय 48), प्राजक्ता जाधव (वय 22) आणि शितल जाधव ( वय 18) अशी मृतांची नावे आहेत.या प्रकारामुळे गावात शोककळा पसरली असून आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही.याबाबत अधिक माहिती अशी की, अकोले तालुक्यातील मन्याळे गावात ही दुर्देवी घटना घडली. मुलींची आई सुनिता जाधव यांनी गळफास घेत आत्महत्या केली.तर,त्यांच्या मुली प्राजक्ता जाधव आणि शितल जाधव या दोघींनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. आईने आत्महत्या केल्यानंतर मुलीनी देखील आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे.या तिघींचेही मृतदेह सध्या अकोले ग्रामीण रुग्णालयात आहेत.पोलीस तपासानंतर आत्महत्येचे कारण स्पष्ट होणार असल्याचे म्हटले जात आहेपोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
