अहमदनगर प्रतिनिधी (दि.१ मार्च):-अहमदनगर जिल्ह्यातील नगर पुणे रोडवर सुपा टोलनाक्यावर वाहन चालवत असलेल्या महिलेला बेदम मारहाण केल्याप्रकरणी सुपा पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांना निलंबित केले आहे.तसेच दोन दिवसापूर्वी सुपा ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना ही पीआय गोकावेची निलंबनाची मागणी केली होती. नितीनकुमार गोकावेयांना निलंबित केले आहे अशी माहिती भाजपाच्या महिला आघाडी प्रमुख चित्राताई वाघ यांनी दिली आहे.
