वर्धा जिल्हा प्रतिनिधी (गणेश हिवरे):-मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी मोलाचे परिश्रम घेतले गेले होते.तसेच महाराष्ट्राची शान भजन कीर्तन भारुड ऐकताच हरपुन जाते.भान काना मात्रा वेलांटीचे मिळाले आहे वाण साहित्य आणि इतिहासात तेही आहे खूप मान अशा मराठी भाषेचा बाळगावा थोडा गर्व अशाच या दिनानिमित्त हिंघणघाट तालुक्यातील सातेफळ येथील भजनी मंडळानी वृषारोपण करून मराठी राजभाषा दिन साजरा केला.त्यावेळी सर्वधर्मसमभाव सांस्कृतिक कला मंच संस्था वर्धा या संस्थेच्या संस्थापिका दीपमालाताई मालेकर तसेच सरपंच श्रीराम मेश्राम,तंटामुक्ती अध्यक्ष सुधाकरराव आगळे,पोलिस पाटील मनोहर लाखे,जयदुर्गा महिला भजन मंडळ व सर्व सभासद यावेळी उपस्थित होते.
