मोठी बातमी..अहिल्यानगरकरांचे बोअरवेल कधीच आटणार नाहीत? महापालिकेला मिळाला ‘हा’ मास्टरप्लॅन!वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य तुलसीराम पालीवाल यांनी महापालिका आयुक्तांना पाठवले पत्र..
महाराष्ट्र न्यूज 24(अहिल्यानगर):-शहरातील सतत घटणारी भूजल पातळी आणि बोअरवेलमधील पाण्याचा वाढणारा क्षार (खारटपणा) या गंभीर समस्येवर आता एक अत्यंत महत्त्वाचा आणि कठोर उपाय समोर आला आहे.अहिल्यानगर शहरातील सर्व १ लाख ३० हजारांपेक्षा जास्त नोंदणीकृत मालमत्तांवर ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ (Rain Water Harvesting) सक्तीचे करावे,अशी आक्रमक मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य तुलसीराम पालीवाल यांनी महापालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात हा नवा ‘मास्टरप्लॅन’ मांडला आहे.जर हा निर्णय लागू झाला,तर दरवर्षी कोट्यवधी लिटर पावसाचे पाणी जमिनीत जिरवले जाऊ शकते,ज्यामुळे शहरातील बोअरवेल कधीच कोरड्या पडणार नाहीत आणि पाण्याची गुणवत्ताही सुधारेल.नवीन बांधकामांना परवाना देतानाच रेन वॉटर हार्वेस्टिंगची अट बंधनकारक करा,जे बांधकाम व्यावसायिक किंवा नागरिक RWH सिस्टीम बसवणार नाहीत,त्यांना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला (OC) देऊच नये,९० दिवसांत तपासणी अन् दंडात्मक कारवाई,शहरातील जुन्या १,३०,००० मालमत्तांची पुढील ९० दिवसांत तपासणी केली जावी.ज्या घरांवर ही यंत्रणा नसेल,त्यांना नोटीस देऊन दंडासह रेन वॉटर हार्वेस्टिंग बसवणे बंधनकारक करावे.
सिमेंटचे रस्ते अन् मनपाचा खर्च,सध्या शहरात सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे जाळे पसरत आहे,ज्यामुळे पाणी जमिनीत मुरणे बंद झाले आहे.
रस्ता झाल्यावर नागरिकांना रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे तांत्रिकदृष्ट्या कठीण व महाग पडते.त्यामुळे सांडपाणी चेंबर प्रमाणेच रस्त्यालगतच्या रेन वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चरचा खर्चही महापालिकेने स्वतः करावा,अनुदान आणि जनजागृती,नागरिकांना यासाठी प्रोत्साहन मिळण्यासाठी महापालिकेने विशेष अनुदान द्यावे आणि जनजागृती मोहीम राबवावी.“पाणी ही सर्वांची मूलभूत गरज आहे.जर आज आपण कठोर निर्णय घेतले नाहीत,तर भविष्यात शहरातील सर्व बोअरवेल पूर्णपणे कोरड्या ठाक पडतील.या सामाजिक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिकेने कोणतीही तडजोड न करता कठोर पावले उचलावीत.आता महापालिका आयुक्त या मागणीवर काय कठोर निर्णय घेतात आणि अहिल्यानगरकरांना पाणीटंचाईपासून दिलासा मिळतो का,याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
