इचलकरंजीत सावरकर चषक जलतरण स्पर्धेत कराडच्या पठ्ठ्यांचा धमाका! थेट सुवर्ण,रौप्य अन् कांस्य पदकांची लूट!कराडच्या अर्णव,तनवीरा अन् रुद्रांशचा राज्यस्तरीय स्पर्धेत जलवा!
कराड (प्रतिनिधी – विजया माने):-इचलकरंजी येथे पार पडलेल्या चौथ्या राज्यस्तरीय ‘सावरकर चषक’ जलतरण स्पर्धेत कराडच्या H2O स्विमिंग क्लबच्या जलतरणपटूंनी आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.महाराष्ट्र, बेळगाव आणि गोवा येथील २७० हून अधिक कसलेल्या जलतरणपटूंना मागे टाकत कराडच्या खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकांवर आपले नाव कोरले.८ आणि ९ ऑगस्ट रोजी ‘सावली सोशल सर्कल’तर्फे या स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत H2O क्लबच्या खेळाडूंनी पाण्याच्या लाटांवर स्वार होत पदकांची लयलूट केली:
🥇 अर्णव गणेश चव्हाण: ५० मीटर फ्लाय आणि ५० मीटर फ्रीस्टाईलमध्ये सुवर्णपदक, ५० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्यपदक, आणि रिले प्रकारात कांस्यपदक मिळवत स्पर्धेचा नायक ठरला.
🥇 अविष्कार जगदाळे: ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.
🥉 तनवीरा जावेद शेख: १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात जिद्दीने पोहत कांस्यपदक मिळवले.
🥉 रुद्रांश नानासाहेब पाटील: १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात कांस्यपदक आपल्या नावे केले.
या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक ओमकार भुईंगडे सर यांचे मोलाचे आणि खडतर मार्गदर्शन लाभले. त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या या खेळाडूंनी आज राज्यस्तरीय पटलावर कराडचा झेंडा रोवला आहे.या दैदिप्यमान यशामुळे कराडच्या क्रीडा वर्तुळात प्रचंड उत्साहाचे वातावरण असून, सर्वस्तरातून या बाल-जलतरणपटूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भविष्यात हेच खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत देशाचे प्रतिनिधित्व करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
📢 विशेष सूचना: H2O स्विमिंग क्लबतर्फे जलतरणाच्या कंपिटिशन बॅचेस (Competition Batches) सध्या सुरू आहेत. इच्छुक खेळाडूंनी आणि पालकांनी आजच प्रवेशासाठी संपर्क साधावा!
