वर्धा जिल्हा प्रतिनिधी(गणेश हिवरे):-साहूर नजीकच्या धाडी येथील अल्पभूधारक शेतकरी वामन उकडराव मडावी वय 52 वर्ष हे शेतात काम करण्याकरिता गेले असताना जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने वामनराव मडावी यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांना जागीच ठार केले.ही घटना दि.28 फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता घडली असून धाडी येतील ही वाघाच्या हल्ल्याची दुसरी तर साहूर परिसरातील तिसरी घटना आहे.मिळालेल्या माहितीनुसार धाडी येथील अल्पभूधारक शेतकरी वामन मडावी यांच्याकडे तीन एकर शेती असून अगदी जंगलाला लागून आहे.याच शेतात वामनराव मडावी हे 28 फेब्रुवारी रोजी सकाळी सकाळी नऊ वाजता कामानिमित्त गेले असता शेतात काम करत असताना मौजा धाडी शेत शिवारात वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जिवंत मारले वाघाने मडावी यांच्या नरडीचे रक्तपित शरीराचे लचके तोडून शरीरावर अनेक जखमा करून शरीर चाळणी केले. यापूर्वी धाडी येथीलच विश्वनाथ राऊत यांच्यावर अस्वलाने हल्ला करून त्यांचा बळी घेतला होता.तर वडाळा शहीद येथील भिवजी हरले यांचा सुद्धा वाघाच्या हल्ल्यात जीव गेला होता.त्यामुळे परिसरात आता वाघाची दहशत निर्माण झाली आहे. बराच उशीर झाला असतानाही वामनराव मडावी घरी परत का आले नाही म्हणून त्यांचा मुलगा सायंकाळच्या दरम्यान पाहण्यासाठी गेला त्याने वडिलांची शोधाशोध केली असता वडील दिसून न आल्याने तो घरी परत आला त्यानंतर पुन्हा दि.1 मार्च रोजी सकाळी आठ वाजता मुलासह गावातील काही नागरिक वामनराव मडावी यांना शोधण्यासाठी गेले असता शेताला लागून असलेल्या जंगलात त्यांचा मृतदेह वाघाच्या हल्ल्यात छिन्नभिषिन्न अवस्थेत आढळून आला.यावरून नक्कीच वाघाने हमला केल्याचे गृहीत धरून वन विभागाला सूचना करण्यात आली वनविभागाने पोलीस स्टेशनला सूचना करून पोलीस व वन विभागाचे कर्मचाऱ्यांनी धाडी येथे पोहोचतात मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह सामान्य रुग्णालय आर्वी येथे पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला वामन मडावी यांच्या पश्चात पत्नी ललिता मडावी व दोन मुले असा आप्तपरिवार असून या दुःखद घटनेने मडावी परिवारासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.आमच्या घरचा करता पुरुष निघून गेल्याने आमच्यावर आभाळ कोसळले असून आता आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने वनविभागाने माझ्या एका मुलाला नोकरीत सामावून घ्यावे अशी मागणी वामन मडावी यांच्या पत्नी ललिता मडावी यांनी वनविभागाकडे केली आहे.
