अहमदनगर प्रतिनिधी (दि.१ मार्च):-दि.२८ फेब्रुवारी रोजी हार्मनी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्याकडून शहरातील विविध भागातील विविध चौकामध्ये वाहतूक नियमाबाबत जनजागृती करण्यात आली.यामध्ये शहरातील भिस्तबाग चौक, पद्मावती पेट्रोलपंप चौक, सह्याद्री चौक,दुध डेअरी चौक इत्यादी ठिकाणी जनजागृती करण्यात आली,यावेळी मुलांनी आपल्या हातामध्ये ‘सडक सुरक्षा का रखो ध्यान ट्रॅफिक नियमों का करो सम्मान’, ‘नजर हटी दुर्घटना घटी’, ‘सफर में कितनी कम हो दूरी हेलमेट लगाना है जरूरी’, ‘सड़क सुरक्षा जीवन रक्षा’,अशा जनजागृती करणाऱ्या घोषणांचे पोस्टर हातात घेऊन जनजागृती केली.यावेळी विद्यार्थ्यासोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.कैलास वाघ,शाळेचे प्राचार्य श्री.अशोक बेरड, ज्येष्ठ शिक्षक श्री.अशोक पाटोळे,प्रीतिका दहिफळे मॅडम,क्रीडा शिक्षक अमोल ठोंबे तसेच पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब वाघ,पोलीस नाईक जावेद शेख,पोलीस कॉन्स्टेबल युवराज गव्हाणे, पोलीस कॉन्स्टेबल मधुकर ससे,पोलीस कॉन्स्टेबल अतुल लगड,पोलीस कॉन्स्टेबल जालिंदर शिंदे,पोलीस कॉन्स्टेबल शरद वर्पे इत्यादी विद्यार्थ्यांसोबत उपस्थित राहून जनजागृती केली. हार्मनी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.कैलास वाघ व त्यांच्या संपूर्ण टीमने मुलांचे कौतुक केले व भविष्यात असे उपक्रम राबवण्यासाठी मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.
