रिक्षा संघटनेचा मोठा स्फोट..! स्क्रॅप रिक्षांमधून १२०० रुपयांची हप्तेखोरी;अहिल्यानगरमध्ये स्वातंत्र्यदिनी रिक्षा संघटना काळे झेंडे दाखवून पालकमंत्र्यांना घेराव घालणार!
महाराष्ट्र न्यूज 24 (अहिल्यानगर):-नगर शहरात परवाना नसलेल्या व स्क्रॅप केलेल्या शेकडो रिक्षा राजरोसपणे धावत आहेत. केवळ ३ प्रवाश्यांचा परवना असलेल्या रिक्षांमधून सर्रास जादा १० ते १२ प्रवाश्यांची बेकायदेशीर वाहतूक होत आहे.वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने राजरोजपणे हे होत आहे. यासाठी वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी रिक्षाचालकांकडून १२०० रूपये महिन्याप्रमाणे हप्ते गोळा करून प्रवाशांच्या जिवाशी खेळत आहेत. त्यामुळे परवाना नसलेल्या रिक्षा तातडीने जप्त करून कायमस्वरूपी बंद कराव्यात, तसेच हप्तेखोर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही कडक कारवाई करून राज्य गुन्हा अन्वेशन विभागाकडून या हप्तेखोरीचा तपास करावा. अन्यथा दि.१५ ऑगस्ट रोजी आहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून घेराव घालू,या इशाऱ्याचे निवेदन अहिल्यानगर जिल्हा रिक्षा चालक मालक संघटनेचे कार्याध्यक्ष विलास कराळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना दिले.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनांत नमूद केले आहे की,नगर शहरात ५५०० रिक्षांची अधिकृत नोंद आहे. मात्र शहरात या रिक्षा व्यतिरिक्त आर.टी.ओ कडे नोंद नसलेल्या व स्क्रॅप केलेल्या हजारो रिक्षा राजरोसपणे प्रवासी वाहतूक करत आहेत. तसेच बेकायदेशीरपणे रिक्षांमध्ये १० ते १२ प्रवासी कोंबून बसवले जात असून प्रवाश्यांच्या जीवाचा खेळ केला जात आहे.हे सर्व बेकायदेशीर कामे वाहतूक शाखेच्या व प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आशीर्वादाने होत असून वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी रिक्षाचालकांकडून १२०० रूपये प्रती महिना हप्ता घेत आहेत.प्रवाश्यांच्या जीवाचा खेळ हे अधिकारी व विना परवाना रिक्षाचालक करत आहेत.हा प्रकार तातडीने थांबवा व परवाना नसलेल्या रिक्षा तातडीने जप्त करून कायमस्वरूपी बंद करा.तसेच हप्ते खोर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावरही कडक कायदेशीर कारवाई करून राज्य गुन्हा अन्वेशन विभागाकडून या हप्तेखोरीचा तपास करावा. अन्यथा दि.१५ ऑगस्ट रोजी आहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांना काळे झेंडे दाखवून घेराव घालू, असा इशारा देण्यात आला आहे.दिलेल्या निवेदनावर अहिल्यानगर जिल्हा रिक्षा चालक मालक संघटनेचे उपाध्यक्ष नासीर खान,दत्ता वामन,सुधाकर साळवे,अशोक औशिकर,लतीफ शेख, गणेश आटोळे आदींच्या सह्या आहेत.
