आद्यनृत्यांगना नामचंद पवळा भालेराव यांच्या १५६ व्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन..सामाजिक,सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन,गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-एकोणिसाव्या शतकातील स्त्रिया कला क्षेत्रात काम करत नव्हत्या.त्या काळात आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर यांनी मोठ्या धाडसाने स्टेजवर पाऊल ठेवून महाराष्ट्रभर सर्वत्र लावण्या सादर केल्या.लावणीला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले.
आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव यांची १५६ वी जयंती १२ ऑगस्ट रोजी कला सम्राज्ञी पवळा कलामंच व महात्मा फुले,डॉ.आंबेडकर, राजश्री शाहू विचार मंच हिवरगाव पावसा ता.संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात येणार आहे.जयंतीनिमित्त गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आणि अभिवादन सभेचे आयोजन हिवरगाव पावसा येथे करण्यात आले आहे.
आद्यनृत्यांगणा पवळा भालेराव यांच्या १५६ व्या जयंतीनिमित्त १२ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम व अभिवादन सभेचे आयोजन राजकीय,कला,सांस्कृतिक,
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे.कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत भालेराव व नामचंद पवळा यांचे पणतू सचिव नितीनचंद्र भालेराव, बाळासाहेब भालेराव,सोमनाथ भालेराव,रंजना भालेराव, भाऊसाहेब निळे,सुयोग भालेराव,मन्सूर इनामदार, यादव भालेराव,बाबासाहेब कदम यांच्या सह सरपंच,
उपसरपंच ग्रामपंचायत हिवरगाव पावसा, ग्रामस्थ आणि सर्व संस्था पदाधिकारी,भीमशक्ती तरुण मित्र मंडळ यांनी केले आहे.
