महापालिका कर्मचाऱ्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडणाऱ्या एकास पोलिसांनी घेतले ताब्यात..
महाराष्ट्र न्यूज 24 (अहिल्यानगर प्रतिनिधी):-अहिल्यानगर शहरातल्या मुकुंदनगर परिसरात अचानक असं काही घडलं,ज्यामुळे संपूर्ण शहराची झोप उडाली आहे! दर्गा दायरा भागात ७ ऑगस्ट रोजी महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर अत्यंत भयंकर असा प्राणघातक हल्ला झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या धीरज यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चक्रे वेगाने फिरवली अन् संशयित आरोपी युनूस शेख याला क्षणाचाही विलंब न लावता बेड्या ठोकल्या!
त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची थेट ३ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.मात्र या भयंकर हल्ल्यामागील ३ मुख्य आरोपी अद्याप मोकाट आहेत.त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत.भिंगार कॅम्प पोलिसांचे पथक आज (८ ऑगस्ट) रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांच्यासह थेट घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण परिसराचा पंचनामा सुरू आहे.हा प्राणघातक हल्ला नेमका कोणत्या वैयक्तिक किंवा इतर कारणावरून झाला?यात आणखी कोणत्या मोठ्या नावाचा सहभाग आहे?याचा उलगडा लवकरच पोलीस तपासात होणार आहे. दरम्यान,या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण अहिल्यानगर शहरातून आरोपींवर कठोरतम कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे.
