३ बड्या गुटखा माफियांवर एलसीबी चा एकाच वेळी छापा..! कारवाईने गुटखा माफीयांचे धाबे दणाणले..
अहिल्यानगर (महाराष्ट्र न्यूज 24):-जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या दणकेबाज आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) श्रीगोंदा शहरात थेट ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला आहे.बंदी असलेला सुगंधी तंबाखू आणि पानमसाला विकणाऱ्या ३ मोठ्या अड्ड्यांवर एकाच वेळी छापे टाकून पोलिसांनी गुटखा माफियांना चांगलाच दणका दिला आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने टाकलेल्या या धाडींमध्ये १, १०,९७६/- (एक लाख दहा हजार नऊशे शहात्तर रुपये) किमतीचा अवैध पानमसाला व सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आला असून ६ आरोपीं विरुद्ध ३ गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंचांसमक्ष श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या यामध्ये स्वप्नील भिमराव कवडे (वय ३२,रा. होले मळा,श्रीगोंदा),अमोल रामदास जाधव (रा. लिंपनगाव,ता.श्रीगोंदा फरार), (गुरनं ७४८/२०२६):
जप्त मुद्देमाल: ₹३५,८६०/-,बन्सी गंगाधर काळे (वय ६२,रा. अवधुतनगर, श्रीगोंदा),(गुरनं ७४९/२०२६):जप्त मुद्देमाल: ₹१२,१००/-अल्ताफ गुलाब मुजावर (वय ५४,रा.तान्हाई अपार्टमेंट,श्रीगोंदा),सलीम दिलावर पिरजादे (रा. अजनूज,ता.श्रीगोंदा फरार) या सर्व आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे प्रमुख संतोष मुटकुळे,पोलीस अंमलदार गणेश लोंढे,अमोल कोतकर, मनोज साखरे,प्रताप देवकाते, सुनिल मालणकर आणि बाळासाहेब गुंजाळ यांच्या विशेष पथकाने ही धडक कामगिरी केली आहे.पोलिसांच्या या खाक्यामुळे श्रीगोंद्यातील अवैध गुटखा आणि मावा विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून “जिल्ह्यात अवैध धंदे चालवाल तर गाठ पोलिसांशी आहे!” असा कडक इशाराच या कारवाईतून देण्यात आला आहे.
