RTO च्या पत्राला तहसीलदारांनी दाखवली केराची टोपली..! नियमबाह्य लाल अंबर दिवा अद्यापही सुरू मनसे पुन्हा आक्रमक..
अहिल्यानगर (पारनेर):- केंद्र सरकारने 2017 मध्येच बंद केलेल्या VIP “लाल दिवा” संस्कृतीचे उल्लंघन करणाऱ्या MH16DG8719 या पारनेर तहसीलदार वापरत असलेल्या वाहनावर कारवाई करण्यास आरटीओ प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.मनसे ने दिलेल्या तक्रारीवरून आरटीओ अहिल्यानगर यांनी तहसीलदार पारनेर यांना पत्र लिहून तब्बल आठवडा उलटला तसेच तहसीलदारांना कारवाईचे आदेश दिले असतानाही अद्यापही त्या पारनेर तहसीलदार वापरत असलेल्या शासकीय वाहनावरील नियमबाह्य लाल-अंबर दिवा काढण्यात आलेला नाही त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता आणखी आक्रमक पवित्रा घेणार आहे.मनसे पारनेरचे तालुकाध्यक्ष श्री.अविनाश पवार यांनी 05.08.2026 रोजी RTO कडे तक्रार दाखल केली होती.
MH16DG87119 या वाहनावर नियमबाह्य अनाधिकृत पणे लाल दिवा लावून संबंधित वाहनाला काळ्या रंगाच्या काचा लावून पारनेर तालुक्यात दहशत पसरवली जात असल्याचे फोटो पुराव्यासह सादर केलेले आहेत त्यावर कारवाई च्या भितीने फक्त काळ्या काचा काढल्या गेल्या व काळे पडदे लावून परत नियम धाब्यावर बसवून अंबर दिवा मात्र काढला गेला नाही,त्यामुळे संबंधित वाहनांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला होता त्यामुळे अता संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे पवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने केलेल्या तक्रारीची दखल घेत प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दि.06.08.2026 रोजी तहसीलदार,पारनेर यांना पत्र क्र.2047 पाठवले.पत्रात केंद्र शासनाच्या एस आर 423(E) आणि एस ओ 1374(E) अधिसूचनांचा हवाला देऊन “तात्काळ कारवाई करा” असे स्पष्ट निर्देश दिले.मात्र आज आठवडा उलटूनही तहसील प्रशासनाने अद्याप स्वतः च्या गाडीवरील लाल अंबर दिवा काढला नाही नियमबाह्य दिवा असले वाहन बिनधास्त पारनेर तालुक्यात फिरत आहे.केंद्राचा कायदा,RTO चे पत्र सगळे कागदावरच राहणार का? सामान्य माणसासाठी कायदा आणि शासकीय अधिकाऱ्यांसाठी सवलत अशी दुजाभावाची वृत्ती मनसे खपवून घेणार नाही.
जर दिलेल्या मुदतीत कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर बोलल्या प्रमाणे आर टी ओ ला रस्त्यावर फिरू देणार नाही आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला गृहीत धरले तर सर्व सामान्य जनतेला नियम शिकवणाऱ्या आर टी ओ ची गाडी दिसेल तीथ फोडणार असल्याचे अविनाश पवार यांनी स्पष्ट सांगितले आहे होणाऱ्या परिणामांना आर टी ओ अहिल्यानगर जबाबदार असल्याचे पवार यांनी स्पष्ट सांगितले कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई केली नाही तर आर टी ओ सोबत संघर्ष अटळ असल्याचे पवार यांनी आक्रमक भूमिका घेत जाहीर केले आहे.या प्रकारामुळे “कायदा सर्वांसाठी समान आहे” या घोषणेची फक्त हवा झाली का,असा प्रश्न तालुक्यातील सर्व सामान्य जनतेतून उपस्थित होत आहे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय भूमिका घेणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
