Maharashtra247

परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षण करणार्‍या दोन शिक्षकांवर कामात कुचराई केल्याचा ठपका ठेवत निलंबनाचा प्रस्ताव केला संस्थेकडे सादर

 

अहमदनगर प्रतिनिधी (दि.२ मार्च):-अहमदनगर शहरात बारावी परीक्षेच्या बुधवारी १ मार्च रोजी झालेल्या रसायनशास्त्र पेपरला चार विद्यार्थी कॉपी करताना आढळले.तर दादासाहेब रूपवते केंद्रावर पर्यवेक्षण करणार्‍या दोन शिक्षकांवर कामात कुचराई केल्याचा ठपका ठेवत निलंबनाचा प्रस्ताव प्रशासनाने त्यांच्या संस्थेकडे पाठवला आहे.बुधवारी बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर होता. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आशिष येरेकर यांच्या पथकाने शहरातील दादासाहेब रूपवते या केंद्रावर भेट देऊन एका विद्यार्थ्याला कॉपी करताना पकडले.तर माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर यांच्या पथकाने शहरातील सेंट झेविअर हायस्कूलमध्ये 3 विद्यार्थी कॉपी करताना पकडले. दरम्यान,बारावीच्या परीक्षेत आतापर्यंत 24 विद्यार्थी कॉपी करताना आढळले आहेत.सेंट झेविअर हायस्कूल या संवेदनशील केंद्रावर बुधवारी रसायनशास्त्राचा पेपर मोबाईलवर व्हायरल होऊन फुटल्याची अफवा पसरली होती.तथापि भरारी पथक सेंट झेविअर हायस्कूल परीक्षा केंद्रावर पूर्ण वेळ बसून असल्याने ही अफवाच असल्याचे,तसेच तशी अधिकृत तक्रार कोणी केलेली नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले यापुढे परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात अनधिकृत व्यक्ती आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे,तसेच पर्यवेक्षण कामात शिक्षकांची कुचराई आढळल्यास थेट निलंबनाची कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

You cannot copy content of this page