Maharashtra247

माळीवाडा बसस्थानकात एसटी महामंडळाच्या बस खाली आल्याने बसच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू

 

अहमदनगर प्रतिनिधी (दि.२ मार्च):-अहमदनगर शहरातील अत्यंत गजबजलेल्या अशा माळीवाडा बसस्थानकात एसटी महामंडळाच्या बस खाली आल्याने महिलेचा आज जागीच मृत्यू झाला.ही घटना आज गुरुवारी दि.२ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.एसटी महामंडळाच्या एमएच १४ बीटी ११५८ या बसने माळीवाडा बसस्थानकात एका वृद्ध महिलेचा अपघाती मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी चालकाला ताब्यात घेऊन कोतवाली पोलीस ठाण्यात नेले आहे.वृद्ध महिलेची ओळख अजूनही पटलेली नाही.ही महिला आळंदीला जाण्यासाठी माळीवाडा बसस्थानकात आली होती असे समजते.

You cannot copy content of this page