तोफखाना पोलिसांची मोठी कारवाई गावठी कट्ट्यासह तरुणास केले जेरबंद
अहमदनगर प्रतिनिधी (दि.१८ मार्च):-गावठी कट्टे विकत घेणाऱ्या फरार तरुणास तोफखाना पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने केली अटक व त्याच्या राहत्या घरात झडतीमध्ये पोलिसांनी एक गावठी कट्टा ही जप्त केलेला आहे.शेख शहानवाज मोहम्मद ख्वाजा उर्फ शहनवाज मोहम्मद शेख(रा. शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने तारकपूर बस स्टँड परिसरात तीन गावठी कट्टे व नऊ जिवंत काडतुसे पकडली होती.याप्रकरणी एका जणांना अटक केली होती. त्या पकडलेल्या तरुणाने काही गावठी कट्टे शहनवाज मोहम्मद शेख याला दिले असल्याचे म्हटले होते पोलिसांच्या तपासात हे पूर्णतःसमोर आले होते. त्यानुसारच तोफखाना पोलिसांनी कारवाई करून शहानवाज मोहम्मद शेख याला अटक करून त्याच्याकडून एक गावठी कट्टा जप्त केला आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे, तोफखाना पोलीस स्टेशन निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके,पोलीस अंमलदार दत्तात्रय जपे,पोलीस अंमलदार सुनील शिरसाठ, सुरज वाबळे,संदीप धामणे, वसीम पठाण,अविनाश वाकचौरे,अहमद इनामदार, सतीश भवर,सतीश त्रिभुवन, सचिन जगताप,यांनी केली आहे.