मोटरसायकल चोरणारा आरोपी जेरबंद एमआयडीसी पोलिसांची कारवाई;दोन लाख रुपये किमतीच्या चार चोरीच्या मोटारसायकल हस्तगत
अहमदनगर प्रतिनिधी (दि.१८ मार्च):-एमआयडीसी परीसरात मोटार सायकल चोऱ्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेवून एमआयडीसी पोस्टेचे प्रभारी अधिकारी श्री.सपोनि/ राजेंद्र सानप यांचे आदेशाने एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोहेकॉ/१७७५ सांगळे,पोकॉ/२३८४ सुरेश सानप व पोकॉ/१०२४ नवनाथ दहीफळे हे दि.१७ मार्च रोजी पेट्रोलींग करीत असताना नगर मनमाड रोडवर सनफार्मा चौक येथुन एक संशयीत इसम मोपेड स्कुटीवर येताना दिसला त्यास थांबवुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव रवी रामदास नेटके (वय ३५ वर्ष गोटुंबे आखाडा ता.राहुरी जि. अहमदनगर) असे सांगीतले त्यास त्याचे जवळील होन्डा अॅक्टीवा गाडी बद्दल विचारले असता त्याने समाधानकारक उत्तरे न देता उडवा उडवीचे उत्तरे देवु लागल्याने त्यास लागलीच मोटारसायकलसह ताब्यात घेवून त्याचे विरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला गु.रजी.नं.२०९/२०२३ मुंबई पोलीस का.क.१९२४ प्रमाणे दाखल करुन त्याचा तपास करीत असताना सदर इसमाजवळ असलेली मोपेड होन्डा कंपनीची अॅक्टीवा ही मोटारसायकल चोरीची असुन सदर गाडी ही त्याने पुणे भोसरी एमआयडीसी परीसरातुन चोरुन आणली होती.त्या बाबत भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गु.रजि.नं.९६ / २०२३ भादवी क.३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे अशी माहीती मिळाली.तसेच सदर आरोपीस अधिक विश्वासात घेतले असता त्याच्या ताब्यात सातारा परीसर पोलीस स्टेशन संभाजीनगर येथील गु.रजि. नं. ८५/२०२३ भादवी क.३७९ प्रमाणे गुन्हयातील होण्डा कंपनीची काळया रंगाची शाईन मोटार सायकल मिळुन आली तसेच बजाज कंपनीची फोर एस चॅम्पीयन व यामाहा कंपनीची एफझेड एस असे वर्णनाची मोटारसायल मिळुन आल्या.सदरची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक श्री.डॉ.बी.जी.शेखर पाटील व श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,अहमदनगर,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,अहमदनगर व श्री.अजीत पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामिण विभाग,अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी सपोनी / राजेंद्र सानप,पोहेकॉ/१७७५ नंदकुमार सांगळे,पोकॉ/२३८४ सुरेश सानप, पोकॉ/१०२४ नवनाथ दहीफळे,पोकॉ/२६३२ सुरज देशमुख यांनी केलेली आहे.