Maharashtra247

महागाई विरोधात लक्ष हटवण्यासाठी राज्य सरकारने महिलांना बसचे हाफ तिकीट करून खुश करण्याचा केला केविलवाना प्रयत्न-सामाजिक कार्यकर्त्या सौ.सरस्वती घोडके

 

कर्जत प्रतिनिधी (दि.१८ मार्च):-गेली आठ वर्षे देशात महागाईमुळे जनता हैराण झालेली असतानाच सरकार फसव्या योजना राबवून सामान्य जनतेची दिशाभूल करत आहे,अगोदरच एसटी महामंडळ प्रचंड तोट्यात चाललेले असतानाच एसटी कर्मचाऱ्यांना पगार ही वेळेवर होत नाहीत एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला उपासमारीची वेळ आलेली आहे,यातच वाढत्या महागाईमुळे प्रत्येक गृह उपयोगी वस्तू किंवा बाजारातील कोणतीही वस्तू घ्यायला गेले तर मोठ्या प्रमाणात जीएसटी आणि टॅक्स द्यावा लागत आहे.महागाईमुळे गृहिणीच्या घरचं बजेट कोलमडलेल आहे,2014 च्या अगोदर 450 रू.प्रति दराने मिळणारा घरगुती गॅस आज तब्बल बाराशे रुपयाला मिळत आहे, खाद्यतेल डाळी,गहू,ज्वारी असो सगळ्या जीवनावश्यक वस्तूचे भाव अक्षरशः गगनाला भिडलेले आहेत शेतमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे नोकरदाराची ही अतिशय बिकट अवस्था आहे.नोकर भरती बंद असल्यामुळे बेरोजगारी वाढत आहे,महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत हे सर्व असतानाही केंद्र सरकारसह राज्य सरकार झोपेचं साेंग घेत असून महागाई वरती बोलायला कोणीही पुढे येत नाही.ईडी,सीबीआयचा गैरवापर करत विरोधी पक्षातील पुढाऱ्यांचे मुस्कटदाबी केली जात आहे,या निमित्ताने राज्य सरकारला माझी एवढीच विनंती आहे की सामान्य जनतेला महागाईतून दिलासा द्यायला असेल तर घरगुती गॅस,पेट्रोल, डिझेल,खाद्यतेल, जीवनउपयोगी वस्तूंचे भाव कमी करून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सरस्वती घोडके यांनी केली.व केंद्र सरकार व राज्य सरकारवर खरमरीत टीका केली.

You cannot copy content of this page