Maharashtra247

भिंगार कॅम्प पोलिसांची जुगार अड्ड्यावर रेड

 

अहमदनगर प्रतिनिधी(दि.१८ मार्च):-नगर शहराजवळ असलेल्या नागरदेवळे गावातील एका हॉटेलच्या पाठीमागील बाजूस झाडाखाली सुरु असलेल्या जुगार अड्डयावर भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांच्या पथकाने छापा टाकून तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.शुक्रवारी (दि.१७) मार्च रोजी सायंकाळी 5.00 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनकर मुंडे यांना नगरदेवळे गावातील प्रीतम हॉटेलच्या पाठीमागील बाजूस झाडाखाली जुगार अड्डा सुरु असल्याची गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली होती.या माहितीच्या आधारे त्यांनी एक पथक कारवाईसाठी पाठविले.या पथकाने तेथे जावून छापा टाकला असता तेथे काही इसम तीरट नावाचा जुगार खेळताना आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईलव जुगाराचे साहित्य जप्त केले.या प्रकरणी पोकॉ/सागर तावरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 1)वैभव देविदास हराळे वय 19 रा.हराळे मळा नागरदेवळे ता.जि.नगर

2)संतोष बाळासाहेब पानसरे वय 40 राहणार बुऱ्हानगर ता.जि.नगर

3) स्वप्निल अशोक शेलार-रा.नागरदेवळे ता.जि.नगर

या ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिंगार कॅम्प पोलिसांनी कारवाईत 12,575 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अशी माहिती सपोनि/ दिनकर मुंडे यांनी दिली.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे, अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे,पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय नगरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल दिवटे,पोलीस नाईक राहुल द्वारके,पोलीस कॉन्स्टेबल अमोल आव्हाड,पोलीस कॉन्स्टेबल सागर तावरे आदींच्या पथकाने कारवाई केली.

You cannot copy content of this page