अहमदनगर प्रतिनिधी(दि.१८ मार्च):-दि.०८/०३/२०२० रोजी सायंकाळच्या सुमारास गौरीघुमट जवळ, आनंदीबाजार,अहमदनगर या ठिकाणावरून फिर्यादी या पायी दळण दळण्यासाठी जात असतांना त्यांच्या समोरून एक मोटार सायकलवर दोन अनोळखी इसम आले व त्यांनी फिर्यादी यांच्या गळयातील १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन बळजबरीने ओढून तोडून घेवून गेले आहेत.त्यानुसर फिर्यादी महिला नामे श्रीमती आशा रामकृष्ण गोरेगावकर (वय ६९ वर्षे धंदा सेवानिवृत्त,रा.हरिओम अपार्टमेंट,डॉ.हेमंत देशपांडे हॉस्पीटल शेजारी,आनंदी बाजार अहमदनगर) कोतवाली पोलीस ठाणे गु.रजि.नं. ५६१/२०२० भा.द.वि.कलम ३९२,३४ प्रमाणे दि.०८/०३/२०२० रोजी दोन अनोळखी आरोपी इसमांविरूध्द सदरचा गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस पोलीसांनी करून सदर गुन्हयातील आरोपी नामे १)आकाश भाऊसाहेब डाके वय २३ वर्षे रा.बोल्हेगाव, अहमदनगर (२)गणेश भगवान कुऱ्हाडे वय २२ वर्षे रा.बोल्हेगाव,अहमदनगर व (३) बाळासाहेब सोनाजी गायकवाड मुळ रा.घोडेगाव ता.नेवासा जि.अहमदनगर हल्ली रा.गांधीनगर,बोल्हेगाव,अहमदनगर यांचा शोध घेवून त्यांना सदर गुन्हयात अटक करून त्यांचेकडून सदर गुन्हयातील गेल्या एकुण १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पैकी ११.०२० ग्रॅम वजनाची वितळून तयार केलेली सोन्याची गोळी हस्तगत करून जप्त केले.सदर गुन्हयातील जप्त किंमती मुद्देमाल फिर्यादीस ताब्यात देणेबाबत मार्गदर्शन केले असता त्यांनी मा.न्यायालयातून त्याप्रमाणे मुद्देमाल त्यांचे ताब्यात देणेबाबतचा आदेश प्राप्त करून घेतला आहे.सदर आदेशातमा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो,कोर्ट नं.७,अहमदनगर यांनी दि. १४/०३/२०२३ रोजी सदरचा जप्ती किंमती मुद्देमाल फिर्यादी महिलेच्या ताब्यात देणेबाबत पोलीस निरीक्षक,कोतवाली पोलीस ठाणे, अहमदनगर यांना आदेशित केलेले आहे. त्याप्रमाणे फिर्यादी यांना सदर गुन्हयातील आरोपी यांचे कडून जप्त केलेला एकुण ११.०२० ग्रॅम वजनाचे सोन्याची वितळून तयार केलेली गोळी असा किंमती मुद्देमाल परत करण्यात आलेला आहे.सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल कातकाडे नगर शहर विभाग, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री/चंद्रशेखर यादव, पोसई/मनोज महाजन, पोहेकॉ/५५ दिपक साबळे,पोकॉ/३३१ याकुब सय्यद व पोकॉ/दिपक कैतके यांनी केलेली आहे.
