श्रीरामपूर प्रतिनिधी(दि.१९ मार्च):-जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पावसाचा तडाखा सुरु आहे.यामुळे शेती मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.तसेच या बरोबर जीवितहानी पण होत आहे. श्रीरामपूर तालुक्यातील खोकर व भोकर परिसरात दुपारी ४ वाजेच्या सुमारास अचानक आलेले वादळ, विजेचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह झालेल्या पावसामुळे खोकर गावातील इंदीरानगर परिसरात राहत असलेल्या एका इसमाचा मृत्यू झाला.तसेच त्यांची पत्नी जखमी झाली.तसेच एका गाईचाही मृत्यू झाला.तसेच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.खोकर येथे अवकाळी पाऊस,गारपीटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.अनेक ठिकाणी गहु भूईसपाट झाले. त्याच बरोबर खोकर येथे १७ व १८ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अचानक आलेले वादळ,विजेचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह झालेल्या पावसामुळे खोकर गावातील इंदीरानगर परिसरात राहत असलेले राजु नामदेव मोरे (वय ५०) यांचे पडलेल्या विजेच्या धक्क्याने मृत्यु झाला.त्याच बरोबर या पडलेल्या विजेत एका गायीचाही मृत्यु झाला.तर जवळच असलेल्या राजू मोरे यांच्या पत्नी सुनिता राजू मोरे (वय ४५) ह्या गंभीर जखमी झाल्या.त्यांना उपचारासाठी साखर कामगार हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
