स्थानिक गुन्हे शाखेचा थरारक ॲक्शन प्लॅन! जिल्ह्यातील ‘या’ ५ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच वेळी छापेमारी
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एकाच वेळी मोठी कारवाई करत जुगार आणि अवैध दारू तस्करांचे कंबरडे मोडले आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या थेट आदेशानंतर नेवासा,नगर तालुका,राहाता आणि लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्रीत धडक धाडी टाकण्यात आल्या. या थरारक कारवाईत एकूण ५ गुन्हे दाखल करण्यात आले असून ३३ आरोपींना रंगेहात अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या या चक्रिवादळी कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे कडक आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने ४ विशेष पथके तयार करण्यात आली.गुन्हेगारांना सुगावाही लागू नये अशा पद्धतीने सर्व पथकांनी अत्यंत गुप्तता बाळगत एकाच वेळी विविध ठिकाणी छापे टाकले. या मोहिमेत एकूण ६ लाख ५९,००५/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कारवाईचा सविस्तर तपशील व जप्त मुद्देमाल:
१.नेवासा पोलीस ठाणे हद्द (भालगाव व उस्थळ):
नेवासा हद्दीत जुगार आणि दारू विक्रीवर मोठा छापा टाकण्यात आला.येथे जुगार खेळताना ९ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ६९,४३०/- रुपयांचे जुगार साहित्य जप्त केले.तसेच राहुल मिनीनाथ कवडे याच्याकडून २४८०/- रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली.
अटक आरोपी: अलिम शकील शेख,सतिष नानासाहेब भागवत,जालींदर उत्तम खरात, विठ्ठल सुरेश पवार,राहुल मिनीनाथ कवडे,प्रशांत कैलास गायके (सर्व रा.भालगांव), प्रकाश बाळासाहेब जाधव (रा. नेवासा बु.),आकाश रावसाहेब पारखे (रा. गोधेगांव),गणेश दत्तात्रय पवार (रा. उस्थळ खालसा).
२.नगर तालुका पोलीस ठाणे हद्द (सावेडी व रुई छत्तीसी):
नगर तालुक्यात विदेशी दारूच्या तस्करांवर दोन वेगवेगळ्या कारवाया करण्यात आल्या.
पहिली कारवाई: सावेडी येथील प्रेमदान हाडको चौकातून सुरज नारद पंडीत (वय २७) याला ३,१६०/- रुपयांच्या विदेशी दारूसह अटक.
दुसरी कारवाई: रुई छत्तीसी येथून सोमनाथ सुनिल जगदाळे (वय २६) याला ९,७२५/- रुपयांच्या विदेशी दारूच्या साठ्यासह रंगेहात पकडले.
३. राहाता पोलीस ठाणे हद्द (अस्तगाव):
राहाता पोलिसांच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने सर्वात मोठा जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. या छाप्यात तब्बल ४,३६,३१०/- रुपये किमतीचा मुद्देमाल आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून १३ हायप्रोफाइल जुगाऱ्यांना अटक करण्यात आली.
अटक आरोपी: अशोक तुकाराम सोनवणे, अंज्याबापु किसन त्रिभुवन, संजय शिवराम जेजुरकर, निसार कादरभाई शेख, भागवत किसन त्रिभुवन (सर्व रा. अस्तगांव), उस्मान ईब्राहिम पठाण, मुन्नावर इब्राहिम शेख (दोघे रा. बाभळेश्वर), लक्ष्मण गोविंदआण्णा गायकवाड (रा. श्रीरामपुर), अरुण साहेबराव वर्पे (रा. मोरवाडी), राजेंद्र किसन पोटे (रा. लोणी), गोकुळ सोन्याबापु गाडेकर (रा. राहाता), सोपान बबन लहामगे (रा. राजुरी), संजय कचरु राऊत (रा. बेलापुर).
४. लोणी पोलीस ठाणे हद्द (कोल्हार बु.):
लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोल्हार बुद्रुक परिसरात सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून ९ आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. त्यांच्याकडून १,३७,९००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
अटक आरोपी: नईम सलीम सय्यद, कासाम मकबुल शेख, दगडु सखाराम बोरुडे, अमजद रशिद शेख, नवाज महंमद शेख, मोहनराज नारायण बोरुडे (सर्व रा. कोल्हार बु.), इरफान अहमद शेख (रा. चिंचोली फाटा, राहुरी), अनिस सांडु पठाण, जुल्फकार शकील शेख (दोघे रा. भगवतीपुर).
गुन्हेगारांना पोलिसांचा कडक इशारा!
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्पष्ट केले आहे की, अहिल्यानगर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा बेकायदेशीर व्यवसाय खपवून घेतला जाणार नाही. ग्रामीण तसेच शहरी भागातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन होईपर्यंत ही मोहीम अविरतपणे सुरू राहील.या धडक कामगिरीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.संतोष मुटकुळे यांच्यासह पोउपनि संदीप दरवडे,पोउपनि विकास जाधव,पोउपनि कृष्णकुमार सेदवाड,पोउपनि महादेव गुट्टे तसेच पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे,गणेश लोंढे,बाळासाहेब गुंजाळ, किशोर शिरसाठ,योगेश कर्डीले,रिर्चर्ड गायकवाड, शामसुंदर जाधव,भगवान थोरात,रमिझराजा आतार, राहुल द्वारके,प्रकाश मांडगे, सागर ससाणे,अमोल आजबे, महादेव भांड,राहुल डोके, सतिष भवर,विशाल तनपुरे, मनोज साखरे,चंद्रकांत कुसळकर आणि महिला पोलीस अंमलदार वंदना मोढवे यांनी केली आहे.
