नगर तालुका पोलिसांची ३ दारू अड्ड्यांवर धाड..’या’ प्रसिद्ध भागांतील हातभट्ट्या उद्ध्वस्त..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धडक मोहीम हाती घेतली आहे. दि.०४/०७/२०२६ रोजी नगर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी एकाच वेळी ३ वेगवेगळ्या गावठी हातभट्टीच्या दारू अड्ड्यांवर धाड टाकत संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून दिली.या कारवाईत हजारो रुपयांचे रसायन जप्त करून जागीच नष्ट करण्यात आले असून, परिसरात चालणाऱ्या या काळ्या धंद्याचा पर्दाफाश केला आहे.मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, नगर तालुका पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे या कारवाईचे नियोजन केले होते.पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचताच दारू माफियांची एकच पळापळ झाली.या धडक कारवाईत पोलिसांनी युवराज बजरंग गिऱ्हे (रा.खंडाळा,ता. जि.अहिल्यानगर),पोपट गिरधारी गिऱ्हे (रा.खंडाळा, ता.जि.अहिल्यानगर),एक महिला आरोपी (रा. खडकी, ता. जि. अहिल्यानगर)
या तिघांविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात दारूबंदी अधिनियम ६५ ‘फ’ अन्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,या तिन्ही अड्ड्यांवरून तब्बल १४५० लिटर गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याचे कच्चे रसायन जप्त करण्यात आले.बाजार भावाप्रमाणे या रसायनाची किंमत ७२,५००/- रुपये इतकी आहे.मानवी जीविताला धोका ठरू शकणारे हे संपूर्ण रसायन पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पार पाडत जागच्या जागी नष्ट केले आहे.जिल्ह्यात कुठेही अवैध दारू विक्री,हातभट्ट्या किंवा जुगार सुरू असल्यास नागरिकांनी थेट पोलिसांशी संपर्क साधावा.गुन्हेगारांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील,असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.सदरची धडक आणि यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री.सुदर्शन मुम्मका,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.शिरीष वमने आणि नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.गणेश वारुळे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दत्तात्रय हिंगडे,पोलीस हवालदार नितीन शिंदे,आणि पोलीस कॉन्स्टेबल विक्रांत भालसिंग यांनी केली आहे.पोलिसांच्या या कामगिरीमुळे अहिल्यानगर परिसरातील नागरिक आणि महिला वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
