आमदार अमोल खताळ यांची ‘ऑन द स्पॉट’ कारवाई पत्रकार दत्ता घोलप यांच्या जिद्दीमुळे पालखी मार्गाला मिळाला मोठा दिलासा!
संगमनेर (दत्तात्रय घोलप):-संगमनेर तालुक्यातील काकडवाडी हद्दीतील काशीआई माता मंदिर नजिक असणाऱ्या वळण पुलाजवळ असणाऱ्या रस्त्याची साफसफाई व दोन्ही बाजूच्या साईट पट्ट्यांचे मुरमीकरणचे काम कर्तव्यदक्ष कार्यतत्पर आमदार अमोल खताळ पा.यांच्या तात्काळ कार्यवाहीने आज गुरुवार दिनांक 2 जुलै 2026 रोजी मार्गी लागले आहे.रयत शेतकरी संघटनेचे संगमनेर तालुका अध्यक्ष,सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी आमदार अमोल खताळ पा.यांच्याकडे पाठपुरावा करून सदर काम करून घेतलं आहे.आमदार अमोल खताळ यांचे कार्यकर्ते आकाश चकोर यांच्या यंत्रनेने सदर काम पूर्ण केल्याने त्या वळण पुलाजवळील रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.
सदर रस्ता मुरमीकरण व साफसफाई कामाप्रसंगी काकडवाडी गावचे ग्रामपंचायतचे माजी सदस्य अशोकराव मुळे,महालक्ष्मी देवस्थानचे संतोष झुरूळे,ग्रामपंचायत कर्मचारी बस्तीराम मुळे,नानासाहेब गायकवाड,सोमनाथ गांडोळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.आमदार अमोलभाऊ खताळ पा.यांच्या तात्काळ कार्यवाहीने तसेच सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार दत्तात्रय घोलप यांचे पाठपुराव्याने तात्काळ साईट पट्ट्यांचे तसेच मुरमीकरणाचे काम मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले आहेत.
