नागपूर प्रतिनिधी(शिल्पा ठाकरे):-नागपूर जिल्हा परिषदेतील प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण निधी योजनेअंतर्गत गाय व शेळी वाटपात झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत मांडला.यावर उत्तर देताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्याची घोषणा केली आहे.नागपूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यात दुग्ध विकास व शेळी पालन लाभार्थ्यांकरिता गट वाटप योजना राबवली होती खनिजक्षेत्र असलेल्या भागात ही योजना राबविण्यात येते यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला मात्र यात लाभार्थी निवड करताना व गाय व शेळी,मेंढी वाटप करण्यात मोठा भ्रष्टाचार झाला याबाबतच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या या प्रकरणी चौकशीत काय निष्पन्न झाले व कोणता निर्णय घेतला काय कारवाई करणार असा प्रश्न आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य अधिकारी यांच्या मार्फत चौकशी करण्यात येईल अशी माहिती दिली.परंतु बावनकुळे यांचे उत्तराने समाधान झाले नाही.ज्यांनी वाटप केले त्यांनी चौकशी केली असे सांगितले लाभार्थी निवड करण्यासाठी जाहिरात देण्यात आली नाही खान बाधित गावांच्या लाभार्थ्यांची निवड झाली नाही खरेदी करण्याकरिता निविदा काढली नाही जेथून नको तेथूनच गाई खरेदी करण्यात आले इकडच्या गाई तिकडे आणि तिकडच्या इकडे करण्यात आले ज्याने भ्रष्टाचार केला तो चौकशी करू शकत नाही असा मुद्दा उपस्थित केला या प्रकरणात लाभार्थ्यांना पैसा गेलाच नाही.असा मुद्दा उपस्थित केला,तर पैसा वसूल कसा करणार असा प्रश्न करून अधिकाऱ्यांनी पैसा गायब केल्याचे सांगितले त्यामुळे या प्रकरणाची चौकशी पोलीस आयुक्तांच्या माध्यमातून आर्थिक गुन्हे शाखेने करावी अशी मागणी बावनकुळे यांनी केली.
