डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत जुन्या-नव्या आठवणींना देणार उजाळा एक आगळा वेगळा उपक्रम करणार साजरा
अहमदनगर प्रतिनिधी (दि.१९ मार्च):-अहमदनगर शहरातील सर्व भीमसैनिक,जुने कार्यकर्ते,पदाधिकारी आंबेडकरी चळवळी मधील सर्व नेते यांना पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आवाहन करण्यात येते की आपण सर्व गेली कित्येक वर्षांपासून चळवळी मध्ये काम करीत आहोत आणि आंदोलने केली आहेत.त्यामध्ये नामांतर लढा,रमाबाई घाटकोपर गोळीबार,रिडल्स आंदोलन,खैरलांजी प्रकरण,कानपूर घटना,डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा आंदोलन , डॉ.आंबेडकर स्मारक आंदोलन,बहुजन क्रांती मोर्चा असे कित्येक वर्षांपासून आंदोलन झाली आहे.त्याची ज्यांच्या ज्यांच्या कडे कात्रणे,फोटो असतील तर ते पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या कार्यालयात अथवा नेमून दिलेल्या सदस्यांकडे नक्की पाठवा पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे वतीने काढण्यात येणाऱ्या मिरवणुकी मध्ये सर्व अहमदनगर शहरातील जुन्या नव्या आठवणी यांना उजाळा देण्याचं काम पक्षाच्या वतीने सर्व मिळून करणार आहोत.तसेच अहमदनगर शहरातील हयात असणारे व नसणारे अश्या सर्व सन्माननीय नेत्यांची,कार्यकर्त्याची आणि त्यांनी दिलेले सर्व योगदान दिलेले सर्वांची फोटो सुद्धा पाठवावी जेणे करून येणाऱ्या पिढी व नगरकरांना त्यांची कामाची पावती म्हणून मिरवणूक मध्ये एक वेगळ्या पदधतीने ते दाखविण्यात येऊन त्यांचा कार्याचा गौरव करण्यात येणार आहे.सर्व फोटो व कात्रणे १ एप्रिल पर्यंत पाठवावे असे आवाहन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांनी केले आहे.
*संपर्क*
आयु.सोमा भाऊ शिंदे – ९०९०७७२२२२
आयु.विशाल गायकवाड – ७०४०४०४०२३
आयु.किरण जाधव – ७०२८०४०८१०
गौतमीताई भिंगारदिवे – ८६०५५०३२३५
आयु.सुमेध भैय्यासाहेब गायकवाड-९८९०८००९५३