अपघातातील बेवारस वाहने काही किरकोळ गुन्हयामधील दुचाकी तसेच चार चाकी वाहने मूळ मालकांनी कागदपत्रे दाखवून ओळख पटवून आपली वाहने पोलीस ठाण्यातून घेऊन जाण्याचे कोतवाली पोलिसांनी केले आवाहन पोनि.चंद्रशेखर यादव
अहमदनगर प्रतिनिधी (दि.१८ मार्च):-कोतवाली पोलीस ठाण्यात दुचाकी तसेच चार चाकी पडून आहेत.त्या मूळ मालकांनी कागदपत्रे दाखवून ओळख पटवून घेऊन जाण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.बरेच वर्षांपासून कोतवाली पोलीस ठाण्यात अपघातातील तसेच बेवारस वाहने तसेच काही किरकोळ गुन्हयामधील दुचाकी तसेच चार चाकी अशी जवळपास 400 पेक्षा जास्त वाहने जमा आहेत. त्यामध्ये अपघातातील तसेच बेवारस वाहने मोठ्या प्रमाणावर आहेत.सदरची वाहने ही ऊन वारा पाऊस यामुळे खराब होत आहेत. कोतवाली पोलीस स्टेशन येथे सदरचे वाहने ठेवण्यासाठी जागाही उपलब्ध नाही,तसेच सदरची वाहने ही पुढील तपासकामी आवश्यक नसल्याने सदरची वाहने मूळ मालकांनी घेऊन जाण्याचे आवाहन कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केलेले आहे.सदरची वाहने घेऊन जाण्यासाठी वाहनाचे मूळ कागदपत्रे किंवा वाहन खरेदी केल्याची पावती व इतर कागदपत्रे दाखवून ओळख पटवून वाहने घेऊन जावीत.या बाबत कोतवाली पोलीस ठाण्याचे कारकून पोलीस हवालदार दीपक साबळे मोबाईल क्रमांक 9370804547 तसेच पोलीस जवान सुधाकर सिनारे 9850556687 यांच्याशी संपर्क करावा.खालील नमूद व इतर नागरिकांनी आपली वाहने पोलीस ठाण्यातून घेऊन जायची आहेत.
1)रवींद्र रामचंद्र नलावडे राहणार वायफळ तालुका तासगाव जिल्हा सातारा.
2)अभय झुंबरलाल गांधी राहणार जैन गल्ली अहमदनगर.
3)राहुल धर्मराज चेमटे राहणार भूषण नगर केडगाव अहमदनगर.
4)निकम मोहन गजरे राहणार पिंपरी गवळी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर.
5)वैभव दत्तात्रेय लोंढे हॉटेल अंबिका केडगावअहमदनगर.
6)मिलिंद मुकुंद कुलकर्णी राहणार भूषण नगर केडगाव अहमदनगर.
7)शिवाजी पांडुरंग सूळ राहणार गिरिजा शंकर सोसायटी फ्लॅट नंबर १० केडगाव व रेल्वे स्टेशन दौंड जिल्हा पुणे.
8)मंदा राजेंद्र सांगळे राहणार वैष्णव नगर केडगाव अहमदनगर.
9)प्रदीप विठ्ठल खेडकर राहणार जगन्नाथ नगर शिक्षक कॉलनी केडगाव.
10)बाबासाहेब आंबू बनकर राहणार कोल्हेवाडी तालुका जिल्हा अहमदनगर.
ही दहा नावे प्रतिनिधीक स्वरूपात असून आणखी नावे पुढच्या टप्प्यात आपण देणार आहोत अशी माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार/दीपक साबळे,सुधाकर सिनारे हे करत आहेत.