
अहमदनगर (दि.११ सप्टेंबर)-स्नेहबंध फौंडेशनच्या वतीने भिंगार शहरातील उत्कृष्ट गौरी आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेचे महिला सशक्तिकरण, पर्यावरण, पाणी बचत, प्लास्टिकमुक्ती हे विषय ठेवण्यात आले आहेत. या विषयाला अनुसरून स्पर्धकांनी आपल्या गौरी- गणपतीच्या समोर केलेल्या देखाव्याचा एक मिनिटांचा व्हिडीओ स्नेहबंध सोशल फाउंडेशनकडे सादर करावा. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपले व्हिडीओ स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ.उद्धव शिंदे 87 93 19 19 19 या क्रमांकावर 23 सप्टेंबर पर्यंत पाठवावेत. स्पर्धेत ज्या कुटुंबांना सहभाग घ्यावयाचा आहे, त्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे.
‘स्नेहबंध’चे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समिती परीक्षण करून पहिल्या तीन आराशींना मान्यवरांचा उपस्थितीत गौरवण्यात येणार आहे. स्पर्धेत प्रवेश मोफत आहे. या स्पर्धेसाठी भिंगार येथील ‘भंडारी सप्लायर्स’ चे संचालक रुपेश भंडारी हे प्रायोजक आहेत.