Maharashtra247

खुनाचा प्रयत्न करुन पळुन जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींच्या टोळीला श्रीरामपूर शहर पोलिसांनी केले जेरबंद

श्रीरामपूर प्रतिनिधी (दि.१ ऑक्टोबर):-खुनाचा प्रयत्न करुन पळुन जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींच्या टोळीला श्रीरामपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे.

बातमी हकीकत आशिकी,दि. 29 सप्टेंबर रोजी रात्री 9/15 वा.चे सुमारास उमर फारुक मस्जिदीजवळ,वार्ड नं. 02, श्रीरामपूर येथे फिर्यादी यांचा भाऊ सोमनाथ रामदास साळवे (रा.बंजरग चौक वार्ड नं.02,श्रीरामपुर) यास मावशीशी का बोलतो असे म्हणुन 1) केतन त्रिभुवन याने त्याच्या हातातील फायटरने तसेच 2) आकाश त्रिभुवन, 3) रेहान शेख उर्फ रोहण नंदु चोधरी, 4)अभिजीत परेकर, 5)अनिल काकडे,सर्व रा. बंजरग चौक,श्रीरामपुर यांनी जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने बेदम मारहाण केली व त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला असुन बेशुध्द आहे, त्याला पुढील उपचाराकरीता न्युरॉन प्लस हॉस्पीटल अहमदनगर येथे अॅडमीट केले आहे.वगैरेच्या तक्रारीवरुन श्रीरामपूर शहर पो.स्टे येथे गुरनं 1064/2023 भादंवि कलम 307,147,148,149, सह मपोका कलम 37 (1) (3) / 135 प्रमाणे,गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हा गुन्हा दाखल होताच पोनि./हर्षवर्धन गवळी यांनी सदर गुन्हयाचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके व तपास पथकास सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेवून अटक करण्याचे आदेश दिल्याने तपास पथक तात्काळ घटनास्थळी जावुन पाहणी करुन गुप्तबातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषण करुन आरापीचा शोध घेत असतांना तपास पथकास गोपनीय व खात्रीशीर माहिती मिळाली की,सदर गुन्हयातील आरोपी हे अहिल्यादेवीनगर,वार्ड नं.02 येथे आले असुन ते मालेगाव येथे पळुन जाण्याच्या तयारीत आहेत. आता गेल्यास मिळुन येतील, अशी माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी तपास पथक तात्काळ गेले असता तपास पथकास पाहून सदरचे आरोपी हे पळुन जाण्याच्या प्रयत्न करताचा तपास पथकाने त्यांचा पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेतले.त्यांच्याकडे सदर गुन्हयाबाबत चौकशी केली असता सदरील गुन्हा आम्ही मित्रांनी मिळुन केला असल्याची कबुली दिल्याने त्याना सदर गुन्हयात तात्काळ अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर स्वाती भोर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर,डॉ. बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन,हर्षवर्धन गवळी,यांचे कडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक/समाधान सोळंके,पोना/रघुवीर कारखेले,पोकॉ/राहुल नरवडे, पोकॉ/गौतम लगड,पोकॉ/ गणेश गावडे,पोकॉ/ रमिझराजा अत्तार,पोकॉ/ मच्छिद्र कातखडे,पोकॉ/ संभाजी खरात,पोकॉ/ आकाश वाघमारे,यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक/समाधान सोळंके हे करीत आहेत

You cannot copy content of this page