बेकायदेशीररित्या प्रवेश करणाऱ्या जड वाहतुकीमुळे शालेय विद्यार्थ्यांचा शहरातील डीवायएसपी चौकात मृत्यू;१४ टायर ढंपरने मुलास उडवले वाहतूक पोलिसांनी जबाबदारीने लक्ष देण्याची गरज
अहमदनगर (दि.२ नोव्हेंबर):- शहरातील डीवायएसपी चौकात बेकायदेशीररित्या प्रवेश करणाऱ्या जड वाहतुकीमुळे घडलेल्या अपघातात एका १७ वर्षीय शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.ही घटना दि.२ नोव्हेंबर रोजी सकाळी घडली आहे.शहरामध्ये जड वाहतुकीस बंदी असताना देखील सर्रासपणे वावरणाऱ्या जड वाहतुकीच्या प्रवेशाला जबाबदार कोण? आता हाच प्रश्न उपस्थित झाला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून अहमदनगर शहरामध्ये होत असलेल्या अपघात आणि त्या अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळे शहरामध्ये जड वाहतुकीस बंदी घालण्यात आली होती मात्र असा असताना देखील महामार्ग पोलीस व वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्ष मुळे जड वाहतूक सर्रासपणे शहरांमध्ये प्रवेश करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे
या समस्यांवर मात करण्यासाठी बाह्यवळण रस्त्यांचे काम पूर्ण होताच शहरामध्ये सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली. नगर-सोलापूर महामार्गावरुन नगरच्या दिशेने येणारी अवजड वाहने अरणगाव बाह्यवळण रस्त्याने, नगर-पुणे व नगर-कल्याण महामार्गावरील वाहने निंबळक बाह्यवळण रस्त्याने व नगर-मनमाड आणि नगर-औरंगाबाद महामार्गावरील अवजड वाहने वडगाव गुप्ता बाह्यवळण रस्त्याने वळवण्यात आली आहेत. त्या शिवाय इतर उपाय योजनाही करण्यात आल्या मात्र तरीदेखील वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षतेमुळे जड वाहतूक सर्रासपणे शहरांमध्ये प्रवेश करत असून याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.दरम्यान या जड वाहतुकीमुळे वारंवार अपघात होत असल्यामुळे आता तरी वाहतूक पोलिसांनी शहरात वावरणाऱ्या जड वाहतुकीवर कारवाई करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.