अपघातानंतर लूटमार करणाऱ्या सराईत आरोपींना कोतवाली पोलिसांकडून अटक…
अहमदनगर (दि.२ नोव्हेंबर):-अपघातानंतर लूटमार करणाऱ्या सराईत आरोपींना अटक करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे.बातमीची हकीकत अशी की,अहमदनगर शहरात करपे वीट भट्टीजवळुन आशीर्वाद कॉलनीकडे वाहन चालक तक्रारदार अफताब नवाब बागवान (रा.हातमपुरा, अहमदनगर) हे त्याचे नातेवाईकासह अशोक लेलँड मालवाहु टेम्पो क्रमांक एम.एच.16.सी.डी.1657 हीवरुन जात असताना त्यांचे वाहनास थांबवून पाण्याचे बाटलीची मागणी करुन पाणी दिले नाही त्याकारणावरुन लोखंडी फायटरने लोखंडी रॉडने,लाकडी दांड्याने मारहान करुन जिवे मारण्याची धमकी दिली तसेच गाडीतील तक्रारदार यांचे कोल्ड्रींग्स धंद्याचे रोख रक्कम 2,25,000/- रुपये, 10,000/- रु किं.चा विवो कंपनीचा मोबाईल,पाकीट त्यातील महत्वाचे कागदपत्र आधारकार्ड,पॅनकार्ड, ड्रायव्हींग लायसन, बँक एटीएम कार्ड याची चोरी केली आहे.
वगैरे म॥ चे फिर्यादीवरुन अविनाश विश्वास जायभाय व इतर आरोपीतांचे विरुध्द दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
सदरचा गुन्हा दाखल झालेनंतर पो.नि.चंद्रशेखर यादव यांनी गुन्ह्याचा तपास पोउपनिरी/अश्विनी मोरे यांचेकडे देवुन त्यांना गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेणेबाबत आदेश दिला. पोउपनिरी/मोरे यांनी पोलीस अंमलदार यांचे मदतीने गुप्त बातमीदारामार्फत गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेतला असता गुन्ह्यातील आरोपी नामे 1)अविनाश विश्वास जायभाय,दुधसागर सोसायटी, केडगाव,अहमदनगर, 2) अजित रामदास केकाण, रा. सारसनगर,अहमदनगर यांचा शोध घेतला असता मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन गुन्ह्याचे अनुशंगाने तपास करता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.आरोपी अ.नं. 1 यास दि.31/10/2023 रोजी 05.33 वा. व आरोपी अ.नं. 2 यास दि. 01/11/2023 रोजी 00.40 वा. अटक केली असुन सध्या आरोपी पोलीस कस्टडी रिमांड मध्ये आहेत.
पोलीस कस्टडी रिमांड मध्ये आरोपीताने गुन्ह्याचे वेळी असलेले त्याचे इतर साथीदार यांची माहीती दिली असुन पोलीस गुन्ह्यातील इतर आरोपीतांचा शोध घेत आहेत.अटक आरोपींवर मारामारी तसेच चोरीचे बरेच गुन्हे दाखल आहेत.सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदनगर शहर विभाग श्री.अनिल कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक/चंद्रशेखर यादव, पोउपनिरीक्षक/अश्विनी मोरे, पोकॉ/प्रमोद लहारे,पोकॉ/ रवींद्र टकले,पोकॉ/तानाजी पवार,पोकॉ/सत्यजीत शिंदे, पोकॉ/दिपक रोहोकले, सायबर सेलचे राहुल गुंडू यांनी केली आहे.