नगर कल्याण रोडवरील होलसेल फटाका मार्केटमध्ये अग्निशामक दलाचे प्रात्यक्षिके
अहमदनगर (दि.२ नोव्हेंबर):- दि अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनच्या वतीने नगर कल्याण रोडवर होलसेल फटाका मार्केट सुरु झाले असून या ठिकाणी अशोक सेवा सर्व्हिसचे संचालक अशोक तोडमल यांनी अग्निशामकची प्रात्यक्षिके दाखवली अशी माहिती फटाका असोसिएशन चे सचिव श्रीनिवास बोज्जा यांनी यावेळी दिली.
या वेळी अशोक तोडमल यांनी अग्निशमनची माहिती देतांना सांगितले की, फटाका हा ज्वलनशील पदार्थ असून अचानक जर आग लागली तर आपण कशापद्धतीने आग विझवावी या बाबत माहिती सांगून प्रात्यक्षिके ही दाखवली.या वेळी फटाका असोसिएशन चे अध्यक्ष सुरेश जाधव यांनी अशोक सेवा सर्व्हिस चे संचालक अशोक तोडमल यांचे आभार मानले. या वेळी असोसिएशन चे पदाधिकारी व सदस्य विकास पटवेकर, साहेबराव गारकर, देविदास ढवळे, शिवराम भगत, संजय जंजाळे, अरविंद साठे, संजय सुराणा, अमोल तोडकर, सतीश दारकुंडे, मयूर भापकर, देविदास ढवळे व संभाजी कराळे आदी उपस्थित होते.