
अहमदनगर (दि.१ नोव्हेंबर):-बालविवाह हा कायद्याने गुन्हा असला तरी अनेक पालक आपल्या मुला-मुलींचे अल्पवयीन वयात बालविवाह करू पाहात आहेत.हे बालविवाह उधळून लावण्यासाठी तसेच त्या पीडित बालकांचे पुनर्वसन करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात स्नेहालय संस्थेचे अंतर्गत उडान या स्वातंत्र प्रकल्पाचे नव्याने संरचना करून सुरुवात करण्यात आला आहे.
या प्रकल्पाच्या मानद संचालक म्हणून ॲड.बागेश्री जरंडीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्या पदभार सोहळा स्नेहालय संस्थेचे सचिव श्री.राजीवजी गुजर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी स्नेहालय संस्थेचे अनिवासी प्रकल्प विभागाचे संचालक श्री.हनीफ शेख यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.
तसेच उडान प्रकल्पाविषयी माहिती सांगताना सांगितले की, हा प्रकल्प बालकांसाठी असलेले कायदे,त्यांचे हक्क आणि बालविवाह पिडीत मुली आणि संपूर्ण समाज यावर त्याचा होणारा दुष्परिणामाबाबत जागरूकता निर्माण करून अहमदनगर जिल्हा बालविवाह मुक्त करणे बालविवाह मुक्त भारताची प्रेरणा निर्माण करणे हे ध्येय समोर ठेवले आहे. त्याच बरोबर प्रकल्पाचे उद्दिष्ट
1.बालविवाहाची कारणे ओळखणे आणि कृतीद्वारे त्यावर मात करणे. 2.पिडीत मुलींना शिक्षण, आरोग्य सुविधा, रोजगाराचे पर्याय, कौशल्य प्रशिक्षण आणि कायदेशीर मदत, यासह काळजी आणि संरक्षण देऊन पुनर्वसनाच्या संधी उपलब्ध करून देणे.
3.कुटुंबांमध्ये आणि समाजामध्ये बालविवाहामुळे होणारे दुष्परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करणे.
4.बालविवाह प्रतिबंधक कायद्याबाबत जनजागृती करणे.
5.बालविवाह रोखण्याबाबत जिल्हा स्तरापासून ते ग्रामीण आणि वार्ड पातळी पर्यंत असणाऱ्या शासकीय बाल संरक्षण समिती, बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, ग्रामसेवक,बाल विकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग इत्यादी यांसारख्या विविध सरकारी विभाग व कर्मचारी यांना त्यांच्या भूमिकांबद्दल जागृत करणे.
6.सर्व धर्माचे पुजारी, विवाह संस्था, धर्म आणि जात पंचायत प्रमुख, हॉटेल मालक, इव्हेंट मॅनेजर अश्या घटकांना बालविवाह विषयक कायदा आणि त्याचे परिणाम याबद्दल माहिती देऊन त्यांचे प्रबोधन करणे.
7.बालविवाह विषयावर जनजागृतीसाठी विविध सोशल मीडिया चा वापर करणे.
8.जनजागृती कार्यशाळा आयोजित करून पत्रकार, लेखक, इत्यादी मीडिया भागधारकांचे प्रबोधन करणे.
9.बालविवाह पिडीतांसाठी तसेच किंवा ज्यांना त्यासंबंधी माहिती द्यायची आहे. अश्यांसाठी 24×7 हेल्पलाइन उपलब्ध करून देणे. प्रकल्पाचे उद्दिष्ट सोबत घेऊन अहमदनगर जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी कार्य करणार आहोत. तसेच या संबंधित प्रशासकीय विभागांना, अहमदनगर जिल्ह्यातील सामाजिक संस्था आणि स्नेहालय संस्थेतील विविध प्रकल्पांशी समन्वय साधून सातत्यपूर्वक उडान प्रकल्पाचा कार्यात सहभागी करून घेणार आहे. त्यानंतर या कार्यक्रमास उपस्थितीत राहून श्री.राजूजी गुजर सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. उडान प्रकल्पासाठी मानद संचालक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल पुढील कामाच्या वाटचालीसाठी स्नेह शुभेच्छा दिल्या.तसेच उडान प्रकल्प पुढील काळामध्ये कोणकोणत्या दक्षता घेऊन काम करणे आवश्यक आहे, याविषयी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मा.श्री. वैभव देशमुख सर यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या
तसेच स्नेहालय संस्थेने अहमदनगर जिल्हा प्रशासनाला सोबत घेऊन उडान हे अभियान खूप मोठ्या जिल्हा आणि राज्य स्तरावर राबवले आहे. यामुळे मागील चार वर्षात बालविवाह विषयक मोठ्या स्तरावर अहमदनगर जिल्ह्यात कार्य उभे राहिले आहे. या कार्यात चाईल्ड लाईन कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान होते. त्यानंतर उडान प्रकल्पाचे संचालक कक्षाचे उद्घाटन करून ॲड. बागेश्री जरंडीकर यांनी उडान प्रकल्पाचे मानद संचालक म्हणून पदभार स्वीकारला. शेवटी उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमामध्ये डी.सी.पी.यु चाइल्ड हेल्पलाइन चे जिल्हा केंद्र-समन्वयक श्री.महेश सूर्यवंशी, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे श्री.बाळासाहेब साळवे रेडिओ नगरचे संदीप क्षीरसागर, बालभवन प्रकल्पाचे उषा खोल्लम, युवा निर्माण प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक विकास सुतार, चाईल्ड लाईन चे मंजुषा गावडे, सीमा कांबळे,अलीम पठाण,शाहिद शेख आणि उडान प्रकलाचे सोशल वर्कर सौ.कल्पना देशमुख यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला.