
अहमदनगर (दि.१ नोव्हेंबर):-नेवासा तालुक्यातील खडका फाटा येथे २ प्रवाशांना लुटणा-या टोळीतील ३ सराईत आरोपी, ५,२७,०००/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.बातमीची हकिगत अशी की,यातील फिर्यादी श्री.तुषार हरीभाऊ राहिंज रा.शिरापुर आर्वी,ता.शिरूर कासार, जिल्हा बीड व साक्षीदार हे पैसे घेवून त्यांचे नातेवाईकांकडे जाताना खडका फाटा ते नेवासा जाणारे रोडवर लघुशंकेसाठी थांबलेले असताना अनोळखी ८ ते ९ पुरुष व १ महिला आरोपींनी फिर्यादी व साक्षीदार यांना चाकुचा धाक दाखवुन त्यांचेकडील २,२४,२००/- रुपये किंमतीचा माल चोरी करुन घेवुन गेले होते.या घटने बाबत नेवासा पोलीस स्टेशन येथे १०४२/२०२३ भादविक ३९५ प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरची घटना घडल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना एक पथक तयार करून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आदेशित केले होते.नमूद आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अमलदार यांना गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.नमुद आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमून अशा प्रकारचे गुन्हे करणारे रेकॉर्डवरील आरोपींकडे तपास करणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.
पथकाने स्थानिक गुन्हे शाखेकडे उपलब्ध असलेले रेकॉर्डवरील आरोपींचे फोटो फिर्यादी व साक्षीदार यांना दाखवुन संशयीतांची ओळख पटवित असताना फिर्यादी व साक्षीदार यांनी संशयीत आरोपी नामे प्रशांत भोसले व विक्रांत भोसले दोन्ही रा. बुरुडगांव,ता.नगर यांना ओळखले.त्यावरुन पथकाने लागलीच संशयीत आरोपींचा बुरुडगांव,ता.नगर परिसरात शोध घेत असताना मिळालेल्या गुप्तबातमीनुसार संशयीत आरोपी जिल्हा परिषद शाळे जवळ बसलेले आहेत आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने नमुद ठिकाणी जावुन शोध घेत असताना काही इसम पोलीस पथकाची चाहुल लागताच पळुन जावु लागले.पथकाने त्यांचा पाठलाग करुन त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या संशयीतांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) प्रशांत ऊर्फ पप्पु रजनीकांत भोसले २) विक्रांत रजनीकांत भोसले ३) सतिष विनायक तांबे रा. बुरुडगांव रोड,ता.नगर असे असल्याचे सांगितले.
त्यांचेकडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता सुरुवातीस ते उडवा उडवीची उत्तरे देवु लागले त्यांना विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने चौकशी करता त्यांनी त्यांचे इतर साथीदार नामे ४) जनक चव्हाण (फरार), ५) रमेश चव्हाण (फरार), ६) शिवम शिवाजी चव्हाण रा. वाळकी, ता. नगर (फरार), ७) निलेश बाबुशा पवार (फरार), ८)लखन कांतीलाल पवार (फरार), ९) धिरज कांतीलाल पवार अ.क्र. ७ ते १० रा. सावदरवाडी ता. परांडा,जिल्हा धाराशिव अशांनी मिळुन गुन्हा केल्याची कबुली दिल्याने आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.ताब्यात घेतलेल्या आरोपींचे कब्जातुन ५,००,०००/- रुपये किंमतीची शेव्हरलेट कंपनीची कॅप्टीव्हा गुन्हा करताना वापरलेली कार,५,०००/- रुपये रोख, २२,०००/- रुपये किंमतीचे दोन मोबाईल फोन व फिर्यादी यांचे आधारकार्ड असा एकुण ५,२७,००० /- रुपये किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेवुन नेवासा पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर मॅडम, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील शेवगाव विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/सोपान गोरे,पोहेकॉ/दत्तात्रय हिंगडे, विजय वेटेकर,बापुसाहेब फोलाणे,दत्तात्रय गव्हाणे, देवेंद्र शेलार,पोना/रविंद्र कर्डीले,सचिन आडबल, विशाल दळवी,संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे,पंकज व्यवहारे, संदीप चव्हाण,फुरकान शेख, संतोष खैरे,पोकॉ/रोहित मिसाळ,मच्छिंद्र बर्डे,रणजीत जाधव,भाऊसाहेब काळे,अमोल कोतकर,मेघराज कोल्हे,व चापोहेकॉ/ संभाजी कोतकर यांनी केली आहे.