
पाथर्डी प्रतिनिधी (ज्ञानेश कंठाळी):-मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील,यांनी आंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून सुसरे येथील सकल मराठा समाजाच्या वतीने पुढार्यांना गावबंदी करण्यात आली.
सकल मराठा समाज व सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन उस्फूर्तपणे उपोषणात सहभाग घेतला.आरक्षणाबाबत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.यावेळी शाळकरी चिमुकलेही मैदानात उतरल्याचे दिसले.”आम्हालाही आरक्षण मिळाले पाहिजे,तो आमचा अधिकार आहे” असे यावेळी शाळकरी चिमुकले म्हणत होते.आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं ,एक मराठा लाख मराठा अशी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करीत उपोषण करण्यात आले.
यावेळी नानासाहेब कंठाळी, दत्तात्रय कंठाळी, श्रीकांत मिसाळ, राजेंद्र उदागे, भागवत धस , महादेव जगताप, राम राऊत, भाऊसाहेब कराळे, गणेश उदागे, विकास उदागे, बळीराम तेलोरे, ज्ञानेश्वर मिसाळ उपस्थित होते.सुसरे येथे हनुमान मंदीरासमोर ग्रामस्थांंनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.परिसरात चिमुकल्यांच्यासह ग्रामस्थांच्या घोषणाने संपूर्ण परिसर आज दणाणून गेला.