खाजगी प्रवासी बसेसकडून जादा भाडे आकारणी केली जात असल्यास तक्रार नोंदवा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार
अहमदनगर (दि. 2 नोव्हेंबर):-महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळाचे त्या त्या संवर्गाचे टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडेदर विचारात घेऊन खाजगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति किलोमीटर भाडे दराच्या 50 टक्के पेक्षा अधिक राहणार नाही असे कमाल भाडेदर शासनाने सन 2018 रोजी शासननिर्णय निर्गमित करुन निश्चित केले आहेत.
दिवाळीत गर्दीच्या हंगामाच्या काळात खाजगी प्रवासी बसेसकडून जादा भाडे आकारणी केली जात असल्यास संबंधित प्रवाशांनी dycommr.enf2@gmail.com या इमेल वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
खाजगी बस मालकांनी शासन निर्णयानुसार पूर्ण बससाठी आकारावयाचे महत्तम भाड्याबाबतचा विहित नमुन्यात तक्ता तयार करुन व त्याप्रमाणे येणारा प्रती आसन दर दर्शवून खाजगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात यावा. तसेच प्रवाशांच्या माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांकही प्रदर्शित करावा, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.