विजय हिंगे यांच्यावरील खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ आश्वीमध्ये कडकडीत बंद
संगमनेर (दत्तात्रय घोलप):-बांधकाम विभागाच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सेफ्टी पेट्या मा. महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे पीए विजय उर्फ पांडूरंग जगन्नाथ हिंगे (रा.आश्वी, ता. संगमनेर) याने हडप केल्या.यात हॉगिंग बेल्ट,शुज,टॉर्च,बॅग,जेवणाचा डबा, हेल्मेट,पाणी बॉटल,मच्छर दाणी,चटई, अपरन असा मुद्देमाल कामगार विभाग आणि पोलिसांनी हस्तगत केला आहे.यात एका पेटीची अंदाजे किंमत 8 हजार 500 रुपये प्रमाणे 10 पेट्या म्हणजे 85 हजार रुपयांचा अपहार हिंगे यांनी केला आहे.जेव्हा कामगार विभागाचे अधिकारी कारवाई करण्यासाठी आले.तेव्हा हिंगे याच्या नातेवाईकांनी मोठा गदारोळ केला.कारवाई करताना सरकारी कामात अडथळा निर्माण केला.त्यामुळे, हिंगे याच्यासह अन्य सहा जणांवर आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
नुकत्याचं झालेल्या ग्रामपचायत निवडणुकीनंतर सत्ता न मिळलेल्या विरोधकांनी राज्यात असलेल्या सत्तेतून दडपशाहीचा वापर करून षडयंत्र रचत सामाजिक काम करणाऱ्या विजय हिंगे यांच्या घरामागील ऊसात बांधकाम कामगार योजनेतील पेट्या टाकून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याच्या प्रयत्न केला.मात्र यामागील सुत्रधार १५ दिवसात शोधा.अन्यथा पोलिस स्टेशन समोर सर्व ग्रामस्थ अमरण उपोषण करण्याचा इशारा समस्त गावकऱ्यांनी दिला असून या खोट्या गुन्ह्यांच्या निषेधार्थ आश्वी बुद्रुक मध्ये भव्य रॅली काढून आज कडकडीत बंद पाळत निषेध सभा घेण्यात आली.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बु ॥ येथील माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांचे स्वीय साहाय्यक विजय हिंगे यांच्या नेतृत्वाखालील नुकत्याच झालेल्या ग्रामपचायत निवडणुकीत विजयी झाल्याने जिव्हारी लागलेल्या विरोधकांनी षडयंत्र रचत हिंगे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न झाल्याने सर्व ग्रामस्थ एकत्र येत दूध का दूध पाणी का पाणी करण्यासाठी निषेध सभा घेण्यात आली . या निषेध सभेतून आश्वी व परिसरातून आलेल्या लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या .
यावेळी रिपाईचे जेष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड , सामाजिक कार्यकर्ते विजय हिंगे , कॉग्रेस शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले , माजी संरपच महेश गायकवाड , उपसंरपच राहुल ज-हाड , रिपाई (गवई ) जिल्हाध्यक्ष किशोर वाघमारे , विजय शेळके , संतोष ताजणे , गणेश गायकवाड , बाळासाहेब बिहाणी , नवनाथ आंधळे , डॉ संजय सांगळे , संतोष नागरे , संजय कोल्हे , गायकवाड , भाऊसाहेब खेमनर , अनिल भुसाळ , अमोल त्रिभुवन , दिलावर शेख , शिबलापूर संरपच प्रमोद बोंद्रे , जालिंदर बोंद्रे आदीसह हजारोच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते .
यावेळी बाळासाहेब गायकवाड पुढे म्हणाले की , गलिच्छ राजकारण करुन प्रामाणिकपणे सामाजिक काम करणाऱ्या तरुणावर खोटे आरोप करणे म्हणजे अत्यंत घाणेरडा प्रकार आहे. राजकारणात हार – जीत चालू रहाते ज्याला हार पचवंत नाही त्यांनी गलिच्छ राजकारणातून खोटे नाटे प्रयोग करु नये .हवे असेल तर नूतन संरपचासह ही नविन इमारत सुद्धा तुम्हाला घ्या .मात्र प्रामाणिक माणसाला बदनाम करु नका !
आधिकाऱ्यांच्या माध्यमातून हिंगे यांच्या घराभोवती जे षडयंत्र रचन्यात आले ते राजकिय क्षेत्राला काळिमा फासणारी घटना आहे . दडपशाचे राजकारण करून वयोवृद्ध महिलेला जाणून – बुजुन त्रास देण्यात आल्याने सर्व ग्रामस्थ आज एकत्र आले आहेत .
यावेळी विजय हिंगे म्हणाले की , आजपर्यत मी प्रामाणिक काम केले. गोरगरिबांचा मदतच केली आहे . लोकांचा विश्वास असल्याने माझ्या हातात पुन्हा ग्रामपचायत दिली . यातुन मी लोकांचा विश्वासघात करणार नाही .मात्र मी केलेल्या प्रामाणिक कामाला छेद लावण्याकरिता या ना त्या मार्गाने प्रयोग होत आहे . आता लोकांनी ही ओळखले आहे यापूर्वी माझ्यावर ॲट्रॉसिटी दाखल करण्याचा प्रयोग झाला कालही खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी जाणून बुजून मोठे प्रयत्न केले गेले मी अत्यंत सामान्य कुटुंबातील असून मी लोकांच्या मदतीकरताच काम करतो. मात्र सूडबुद्धीने होणारे राजकारण हे या गावासाठी दुर्दैवी आहे ज्यांनी हे षडयंत्र रचले अशा लोकांची चौकशी झालीच पाहिजे अशी आग्रही मागणी ही त्यांनी केली.
यावेळी निषेध सभेतून सचिन चौगुले , किशोर वाघमारे , संतोष ताजणे , गणेश गायकवाड , राहुल ज-हाड , विजय शेळके , बाळासाहेब बिहाणी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या खोट्या गुन्ह्यांच्या निषेधार्थी बुद्रुक बदल कडकडीत बंद पाळण्यात येऊन रॅली काढण्यात आली यावेळी गावातील हजारो महिला, नागरिक व तरुण उपस्थित होते.